भाजपवासी 10 आमदार अस्वस्थ; गोवा मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता 

दैनिक गोमंतक
मंगळवार, 4 मे 2021

मंत्रिमंडळ फेरबदलाची मागणी करून मोन्सेरात यांनी सध्या संथ होत चाललेल्या राजकारणाला गती देण्याचा प्रयत्न चालवला आहे.

पणजी :  कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या 10  आमदारांना आता अस्वस्थ वाटू लागले आहे. पणजीचे आमदार आतानासिओ मोन्सेरात यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  (Dr. Pramod Sawant) यांची भेट घेऊन ही घुसमट  त्यांच्या कानावर त्यांनी घातली आहे. मंत्रिमंडळ फेरबदलाची मागणी करून मोन्सेरात यांनी सध्या संथ होत चाललेल्या राजकारणाला गती देण्याचा प्रयत्न चालवला आहे. (10 MLAs from Congress to BJP are upset; Goa cabinet likely to undergo major reshuffle) 

गोव्यात नाइट पार्ट्या सुरू असल्याने किनारपट्टी भागात ड्रग्ज व्यवसाय जोमात

मोन्सेरात यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी कोविड व्यवस्थापनावेळी गेल्या वर्षी चांगले काम झाले आणि आता ते होत नाही यावर बोट ठेवले आहे. त्यांनी तत्कालीन महसुली अधिकाऱ्यांची स्तुती केली आणि आताच्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीविषयी शंका उपस्थित केली. विशेष म्हणजे महसूल खाते त्यांची पती जेनिफर यांच्याकडेच आहे. मोन्सेरात यांना स्वतःकडे महसूल खाते हवे की काय अशी चर्चा या भेटीनंतर जोर धरू लागली आहे.

मंत्रिमंडळातील 11  सदस्यांच्या नाकर्तेपणाचा फटका 18  आमदारांना बसू नये असे मोन्सेरात मुख्यमंत्र्यांना म्हणाले आहेत. या विधानाचा मोठा अर्थ होत आहे. फटका म्हणजे येणाऱ्या निवडणुकीत या मंत्र्यांमुळे भाजपची विजयी होण्याची संधी कमी होत जाईल, असे मोन्सेरात यांना सूचवायचे असावे असा अर्थ काढला जात आहे. सभापती पाटणेकर यांनी मोन्सेरात यांच्यासह थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकर, ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात, सांताक्रुझचे आमदार आंतोनिओ फर्नांडिस, सांतआंद्रेचे आमदार फ्रांसिस सिल्वेरा, नुव्याचे आमदार विल्फ्रेड डिसा, वेळ्ळीचे आमदार फिलीप नेरी रॉड्रि्ग्ज, कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस, काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस व केप्याचे आमदार बाबू कवळेकर यांना पक्षांतर बंदी कायद्याच्या कसोटीवर पात्र ठरवले आहे.

संबंधित बातम्या