रेलगाडीने दहा हजार प्रवासी निघाले

Dainik Gomantak
शनिवार, 23 मे 2020

नावेली येथे मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये आश्रयास असलेले सुमारे २५०० मजूर या रेल्वेतून जायला गेले असून बिहार झारखंड ओडिसा व मध्यप्रदेशातील सुमारे १०१० मजूर अजूनही या इनडोअर स्टेडियम मध्ये असल्याची माहिती स्टेडियम व्यवस्थापक महेश रिवणकर यांनी दिली.

नावेली

मडगाव रेल्वे स्थानकावरून ४ तर करमळी रेल्वे स्थानकावरून दोन मिळून एकूण ६ श्रमिक रेल्वे उत्तरप्रदेशला सोडण्यात आल्या. सुमारे १०,००० प्रवासी आपल्या मुळगावी गेले. या रेलगाड्या उत्तरप्रदेशला सोडण्यात आल्या.
आता पर्यंत १३ रेल्वे उत्तर प्रदेशला पाठवण्यात आल्याची माहिती कोंकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली. नावेली येथे मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये आश्रयास असलेले सुमारे २५०० मजूर या रेल्वेतून जायला गेले असून बिहार झारखंड ओडिसा व मध्यप्रदेशातील सुमारे १०१० मजूर अजूनही या इनडोअर स्टेडियम मध्ये असल्याची माहिती स्टेडियम व्यवस्थापक महेश रिवणकर यांनी दिली. मडगावच्या दामोदर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यानी शुक्रवारी सकाळी सुमारे ३५०० मजूरांना नाश्ता वाटप करण्यात आले. शनिवारी पुन्हा या मजुरांना नास्ता वाटप करण्यात येणार आहे. रात्रीच्यावेळी सुमारे दीड ते दोन हजार मजूर इनडोअर स्टेडियम मध्ये आश्रयाला येतात असे रिवणकर यांनी सांगितले.
श्रमिक स्पेशल ०१६५८ देवरीया सदर उत्तर प्रदेश साठी १६२८ प्रवासी, रेल्वे क्रमांक ०१६६० प्रतापगड उत्तरप्रदेश, १६२८, प्रवासी रेल्वे क्रमांक ०१६६२ माऊ उत्तरप्रदेश साठी १६२८ प्रवासी मिळून सुमारे १०००० मजूर आपल्या मुळगांवी गेले
 दिल्ली ते मडगाव राजधानी एक्सप्रेस व दिल्ली ते तिरूअनंतपुरम राजधानी एक्सप्रेस तसेच तिरुअनंतपुरम ते दिल्ली राजधानी एक्सप्रेस आज जाणार आहे, अशी माहिती घाटगे यांनी दिली.

संबंधित बातम्या