‘रायेश्वर’च्या १०७ विद्यार्थ्यांची नामांकित आस्थापनात निवड

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

देशातील नामांकित औद्योगिक आस्थापन टाटा कन्सलटन्सी सर्विसीस ही संस्था विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या आस्थापनातील रोजगार संधी उपलब्ध करून देते. दरदिवशी या संस्थेचा संघ या पोर्टलवर वेगवेगळे प्रश्‍न टाकतात. त्याच्या उत्तरामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिक भर पडत असते.

शिरोडा: शिवशैल - शिरोडा येथील शिवग्राम शैक्षणिक संस्थेच्या श्री रायेश्‍वर अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयातील सुमारे १०७ विद्यार्थ्यांची देशातील नामांकित आस्‍थापनात निवड झाल्याबद्दल या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

देशातील नामांकित औद्योगिक आस्थापन टाटा कन्सलटन्सी सर्विसीस ही संस्था विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या आस्थापनातील रोजगार संधी उपलब्ध करून देते. दरदिवशी या संस्थेचा संघ या पोर्टलवर वेगवेगळे प्रश्‍न टाकतात. त्याच्या उत्तरामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिक भर पडत असते. शिवशैल - शिरोडा येथील श्री रायेश्‍वर अभियांत्रिक आणि माहितीतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हा दररोजचा उपक्रम ठरलेला असून या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. या उपक्रमांतर्गत सहभागी झालेल्या महाविद्यालयापैकी उत्कृष्ट आठ महाविद्यालयाची निवड केली जाते. गेल्या तीस दिवसांत श्री रायेश्‍वर अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाने यात प्रथम स्थान पटकावले असून ही घौडदौड अशीच चालू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देऊन उपयोगी नाही, तर योग्य मार्गदर्शन करून देशाचा एक उत्कृष्ट नागरिक आणि अभियंते बनविणे हेच या महाविद्यालयाचे ध्येय व उद्दिष्ट आहे. या महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागातर्फे शैक्षणिक वर्षात वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.

२०२० च्या तुकडीतील १०७  विद्यार्थ्यांची १७ विविध आस्थापनामध्ये निवड झालेली असून त्यांनी प्रत्येकी वार्षिक अडीच लाख ते दहा लाखपर्यंत वेतन मिळणार आहे. या विद्यार्थ्यांची निवड झालेली आस्थापने म्हणजे टाटा कन्सटंन्सी सर्व्हीसीस, परसिस्टन्स सिस्टम लिमिटेड  आयबीएम बेंगलोर, कपेजेमीनी, 

बायतूस इन बिटवीन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड, वनशिल्ड सॉप्टवेअर प्रा. लिमिटेड, अनंत इन्फोमीडिया प्रायव्हेट, सेव्हन्स सेन्स टेलंट सोल्युशन्स, टेनजेनटीचा, चेंग इंडिया बेंगलोर, इनफ्रीमे अँड इनव्हेस्टमेंट बुल र्केपी व अन्य आस्थापने होत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिवग्राम शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष शिरोडकर, महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र असवले आदींनी अभिनंदन केले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या