डिचोलीत नवे ११ कोरोनाबाधित

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

मागील आठवड्यापासून डिचोली तालुक्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आहे. आज सोमवारी तालुक्यात अकरा नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत, तर मागील आठवड्यापासून  डिचोलीतील कोविड सुविधा केंद्रात एकही रुग्ण नसल्याची माहिती मिळाली आहे.

डिचोली :  मागील आठवड्यापासून डिचोली तालुक्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आहे. आज सोमवारी तालुक्यात अकरा नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत, तर मागील आठवड्यापासून  डिचोलीतील कोविड सुविधा केंद्रात एकही रुग्ण नसल्याची माहिती मिळाली आहे. आज मये विभागात ७, तर साखळी विभागात ४ नवीन  कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले  आहेत.

डिचोली विभागात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून उपलब्ध झाली आहे. सोमवारी  डिचोली विभागात ४३, मये विभागात ३१ आणि साखळी विभागात १९ मिळून तालुक्यात एकूण ९८ कोरोनाचे सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. आज तालुक्यातील डिचोली विभागात १ आणि मये विभागात ३ मिळून ४ रुग्ण बरे झाले आहेत. साखळी विभागात एकही रुग्ण बरा झालेला नाही. डिचोलीत - ४०, मयेत - ३१ आणि साखळीत - १९ मिळून ८० रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. डिचोलीतील ३, मयेतील २ आणि साखळीतील ३ मिळून तालुक्यातील ८ रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार चालू आहेत, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून मिळाली आहे.

अधिक वाचा :

निवृत्तीवेतनासाठी मानवाधिकार आयोगाकडे ४० तक्रारी

दिल्लीच्या ऊर्जामंत्र्यांनी चर्चेयाठी यावे

संबंधित बातम्या