Panaji Crime Case: विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणी 'त्या' बसचालकाविरोधात 110 पानी आरोपपत्र...

ख्रिसमस पार्टीसाठी पणजीत आलेल्या विद्यार्थिनीवर बसमध्ये झाला होता बलात्कार
Panaji Sexual Assault Case
Panaji Sexual Assault Case Dainik Gomantak

Panaji Crime Case: नाताळ पार्टीनिमित्त वास्कोहून पणजीत आलेल्या एका विद्यार्थिनीवर मिनी बस चालकाने ती बसमध्ये एकटीच असल्याचा गैरफायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. ही घटना 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी पाटो - पणजी येथे पार्क केलेल्या मिनीबसमध्ये घडली होती.

त्यानंतर आता पणजीतील महिला पोलिसांनी या प्रकरणी संशयित बसचालकाविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

Panaji Sexual Assault Case
Goa Ki Baat : 'मन की बात'च्या धर्तीवर आता राज्यात 'गोवा की बात'

संशयित बस चालक चंद्रशेखर लमाणी याच्याविरोधात 110 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी 25 साक्षीदार निश्चित्त केले आहेत. पणजीतील या धक्कादायक प्रकारानंतर संपुर्ण गोवा हादरून गेला होता.

गुन्हा नोंद करून महिला पोलिसांनी बस चालक चंद्रशेखर वासू लमाणी (35) याला त्या रात्री अटक केली होती. तो मूळचा राज्याबाहेरील होता तर झुआरीनगर बिर्ला वेर्णा येथे तात्पुरत्या स्वरूपात राहात होता.

ख्रिसमस साजरा करण्यासाठी काही विद्यार्थी व विद्यार्थिनींचा एक गट वास्को येथून पणजीत आला होता. या गटाने मिनी बस (जीए 06 टी 5376) भाड्याने घेतली होती. ही मिनी बस पार्क होम हॉटेलजवळ होती. मिनी बसमधून सर्वजण उतरून पार्टीसाठी गेले. पार्टीमध्ये बहुतेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मद्यप्राशन केले.

Panaji Sexual Assault Case
Goa Sand Mafia: शिरोडा-पंचवाडी परिसरात खुलेआम रेती उत्खनाचा 'रात्रीस खेळ चाले'

पीडित विद्यार्थिनीला मद्यप्राशनामुळे अस्वस्थ वाटू लागल्याने ती आराम करण्यासाठी दुपारी पार्किंगमध्ये असलेल्या मिनीबसमध्ये आली. तेव्हा गाडीमध्ये ती एकटीच होती. तेव्हा बसचालकाने तिच्यावर बलात्कार केला. यासंदर्भात कोणाला सांगशील तर तुझीच बदनामी होईल अशी धमकी देऊन तो निघून गेला.

पार्टीसाठी गेलेला विद्यार्थी - विद्यार्थिनींचा गट रात्री नऊच्या सुमारास मिनीबसकडे आल्यावर पीडित विद्यार्थिनीने तिला घडला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com