गोव्यातील नव्या महापालिका इमारतीवर होणार 11. 50 कोटींचा खर्च..!

गोव्यातील (Goa) नव्या महापालिका इमारतिचे (Buildings) बांधकाम दोन टप्प्यात करण्यात येणार आहे.
गोव्यातील नव्या महापालिका इमारतीवर होणार 11. 50 कोटींचा खर्च..!
गोव्यातील नव्या महापालिका इमारतीवर होणार 11. 50 कोटींचा खर्च..!Dainik Gomantak

पणजी: पणजी (Panaji) महापालिकेच्या नव्या इमारतीच्या बांधकाम पायाभरणीचे उद्‍घाटन नगरविकासमंत्री मिलिंद नाईक (Milind Naik) यांच्या हस्ते काल महापालिकेच्या (Municipal corporation) ठिकाणीच करण्यात आले. हे इमारत (Buildings) बांधकाम दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात चारमजली इमारतीच्या (Buildings) या बांधकामावर सुमारे 11. 50 कोटी खर्च होणार असून बांधकाम गोवा (Goa) नगर विकास महामंडळमार्फत (सुडा) दीड वर्षाच्या कालावधीत केले जाणार आहे.

या पायाभरणी कार्यक्रमाला महापौर रोहित मोन्सेरात (Rohit Monserrate) , उपमहापौर वसंत आगशीकर, पालिका प्रशासन संचालक गुरुदास पिळर्णकर, महापालिकेचे आयुक्त आग्नेल फर्नांडिस, पालिका अभियंता पार्सेकर तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी मंत्री मिलिंद नाईक (Milind Naik) म्हणाले की, महापालिकेची (Municipal corporation) ही जुनी इमारत झाल्याने ती कमकुवत झाली आहे. त्या ठिकाणी नवी इमारत (New building) उभी राहणे आवश्‍यक होते.

महापौर रोहित मोन्सेरात (Rohit Monserrate) यांनी या नव्या इमारतीच्या (New Building) कामाचा वारंवार पाठपुरावा पालिका प्रशासनाकडे करत राहिले. त्यांच्या या पाठपुराव्यामुळेच हे बांधकाम लवकर सुरू होण्यास मार्गी लागले. सर्वांनी अशा प्रकारे पाठपुरावा करून काम केल्यास राज्याचा विकास होण्यास मदत होईल, असे मत नाईक यांनी व्यक्त केले. उपमहापौर वसंत आगशीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

सध्याची इमारत पाडणार...

दीड वर्षाचा कालावधीत नवी इमारत (New Building) उभी राहणार असून, त्यामध्ये पार्किंग व्यवस्था(Parking) , महापालिका कार्यालये असतील. पहिल्या टप्प्यातील या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर सध्या असलेली इमारत पाडून दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू केले जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पणजीचे (Panaji) आमदार बाबुश मोन्सेरात यांनीही हे बांधकाम लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे सल्लागार दत्ता कारे (Datta Kare) यांनी या इमारतीच्या आराखड्यासंदर्भात थोडक्यात माहिती देताना सांगितले.

गोव्यातील नव्या महापालिका इमारतीवर होणार 11. 50 कोटींचा खर्च..!
मानवी हक्क आयोगाकडून गोवा सरकारला नोटीस

आराखड्यात दाखवलेल्या महत्त्वाच्या नोंदी

  • सुमारे 2288 चौ. मी. जागेत ही चारमजली इमारत उभी राहील

  • तळघरात 28 व त्यावरील मजल्यावर 27 वाहनांची पार्किंग सोय

  • इलेक्ट्रिकल रूमची स्वतंत्र व्यवस्था

  • तळमजल्यावर व पहिल्या मजल्यावर महापालिकेचे कार्यालय व प्रशासन विभाग

  • दुसऱ्या मजल्यावर महापौर व उपमहापौर, महापालिका आयुक्त व उपआयुक्त तसेच परिषद सभागृह.

  • तिसऱ्या मजल्यावर महापालिका बैठकीसाठी कक्ष तसेच कचरा व्यवस्थापन कक्ष

  • चौथ्या मजल्यावर महापालिका सभागृह असेल.

  • इमारत बांधकामाचे सल्लागार मे. दत्ता कारे अँड असोसिएटस् हे आहेत.

  • मे. एस इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड कंपनी करणार बांधकाम

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com