कोविडोद्रेक : एका दिवसात 1160 नव्या रुग्णांची नोंद, तर 26 कोरोनाबाधितांचा मृत्यू

corona death.jpg
corona death.jpg

पणजी :  जनता, विरोधी पक्ष यांच्याकडून वारंवार मागण्या होत असतानाही राज्य सरकारने राज्याच्या सीमा बंद केल्या नाहीत. राज्याबाहेरून येणाऱ्यांसाठी कोरोनाची लागण नाही, अशा प्रमाणपत्राची सक्ती केली नाही. किनारी भागातील पार्ट्या बंद केल्या नाहीत आणि कसिनोंमध्ये जाणाऱ्यांच्या संख्येवर नियंत्रण आणले नाही. या साऱ्याचा परिणाम म्हणून कोरोनाची लागण होणाऱ्यांच्या आणि कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या साऱ्याचा उद्रेक झाला असून विविध इस्पितळात उपचार घेणाऱ्या तब्बल 26  कोरोनाबाधितांचे आज निधन झाले. (1160 new cases were recorded in one day, while 26 coronary heart disease deaths) 

संसर्गित व कोरोनामुळे गेलेले बळी पाहता राज्य सरकारला आता कोरोनाच्या नियंत्रणासाठी कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. परराज्यातून गोव्यात येणाऱ्यावर पूर्णबंदी किंवा त्यांना कोरोना तपासणीचे प्रमाणपत्र सक्तीचे करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर किमान आठ दिवस राज्यात कडक प्रतिबंध गरज, तसेच कडक लॉकडाऊन लावण्याची गरज आहे, कारण कोरोनाची साखळी तोडणे सध्या गरजेचे आहे.
आज तब्बल 26 व्यक्तींना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले असून दिवसभरात 1160  नवे कोरोना संसर्गित सापडले आहेत. आत्तापर्यंत एका दिवसात कधीच कोरोना बाधितांचा आकडा एक हजाराच्यावर गेला नव्हता, आज तो गेला आणि त्याच्यासोबत कोरोनामुळे मृत्यूही वाढले. त्यामुळे गोमंतकियांत कमालीची भीती निर्माण झाली असून जो तो आपले काय होणार? या काळजीत पडला आहे. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज २२ पुरुष चार महिला मिळून २६ कोरोनाबाधितांचे निधन झाले. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुळे निधन पावलेल्यांची संख्या ९२६ झाली आहे. आज ४४० व्यक्ती बरे झाले. आजच्या दिवशी सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ८२४१ इतकी  झाली आहे.

कडक निर्बंधांची आज घोषणा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोरोना फैलाव आणि कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे वाढते प्रमाण पाहून उद्या सकाळी 11:30  वाजता राज्य कार्यकारी समितीची आणि आपत्तीकालीन व्यवस्थापन समितीच्या बैठका बोलावल्या आहेत. या बैठकीनंतर राज्यात कडक निर्बंध लागू केले जाणार आहेत. यात रात्रीच्या संचारबंदीचा समावेश असू शकतो. दिल्लीत आज मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की टाळेबंदी (लॉकाडाऊन) लागू करणे, हा उपाय असू शकत नाही, असे शहा यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी कोविड व्यवस्थापनाविषयी माहिती घेतली. राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांना दिली. राज्यातील कोविडचा फैलाव रोखण्यासाठी काही निर्बंध लागू करणे गरजेचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. त्यांच्या सूचनेनुसार राज्य सरकार काही निर्बंध लादणार आहे. टाळेबंदी नसेल, मात्र लोकांच्या मुक्त संचारावर निर्बंध असतील. दहावी, बारावीच्या परीक्षांबाबतही निर्णय घेतला जाणार आहे.

9649 जणांचे लसीकरण
राज्यात सुरु असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत 9649 जणांचे लसीकरण झाले. राज्यातील 8 पंचायतीमध्ये टीका उत्सव अंतर्गत आयोजित लसीकरणास 2451  व्यक्तींनी लस घेतली तर सरकारी व खासगी इस्पितळात मिळून 7198  इतके लसीकरण झाले. पणजी येथे आयोजित लसीकरणात ३३१  जणांनी लस घेतली. कोलवाळ कारागृहातील डॉक्टरला ‘कोरोना’कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील आरोग्य केंद्राच्या डॉक्टरला कोरोना संसर्ग झाला असल्याने कैद्यांमध्ये खळबळ माजली आहे. आरोग्य उपचारासाठी त्यांच्या संपर्कात आलेल्या कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात येत असल्याच्या माहितीला कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. या कोरोना संसर्गाचा फैलाव कारागृहात होऊ नये यासाठी आवश्यक काळजी घेण्यात येत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com