गोव्यात कोरोनाचा अकरावा बळी

covid hospital
covid hospital

पणजी

गोव्यात कोरोनाने अकराव्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची खबर आज सकाळी हाती आली आहे. सरकारी पातळीवर या मृत्यूबाबत अद्याप अधिकृतपणे माहिती दिलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार वास्को येथील ८० वर्षे ज्येष्ठ नागरीकावर मडगाव येथील कोविड इस्पितळाच्या  अतिदक्षता विभागात गेले तीन दिवस उपचार सुरु होते. त्या नागरीकाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मरण पावलेला वास्कोतील हा पाचवा रुग्ण आहे. या मृत्यूमुळे गोव्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर दर हजारामागे ४.४४ झाला आहे.

दरम्यान,  बायणा वास्को येथील ३१ वर्षीय कोविड रुग्णानेही कोविड  इस्पितळातच अखेरचा श्वास घेतला आहे. यामुळे वास्को परिसरात कोरोनाने आजवर सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com