राज्यातील शाळांसाठी १२ दिवस दिवाळी सुटी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

शाळांसाठी यंदा दिवाळीची सुटी केवळ १२ दिवसांची असेल. ९ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर हा शाळांसाठी दिवाळी सुटीचा कालावधी असेल असे परिपत्रक शिक्षण संचालक संतोष आमोणकर यांनी जारी केले आहे.

पणजी :  शाळांसाठी यंदा दिवाळीची सुटी केवळ १२ दिवसांची असेल. ९ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर हा शाळांसाठी दिवाळी सुटीचा कालावधी असेल असे परिपत्रक शिक्षण संचालक संतोष आमोणकर यांनी जारी केले आहे. कोविड महामारीमुळे या सुटीच्या कालावधीत कपात करण्यात आली आहे.

दरवर्षी २२ दिवसांची दिवाळीची सुटी असते. यंदा ती घटवून १२ दिवसांची करण्यात आली आहे. नाताळची सुटी मात्र आठवडाभराचीच असेल. २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत नाताळची सुटी असेल.  २६ नोव्हेंबरला तुळशी विवाहानिमित्त सुटी घेण्याची मुभा शिक्षण संचालकांनी शैक्षणिक संस्था प्रमुखांना दिली आहे.

संबंधित बातम्या