विदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने 12 लाखांचा गंडा

मॅन्युएल डिकॉस्ता आणि सॅम्सन फर्नाडिस अशी संशयित आरोपींची नावे असून ते धर्मापुर येथील रहिवाशी आहेत
Fraud Case
Fraud CaseDainik Gomantak

फातोर्डा: पैसे घेऊन विदेशात नोकरी देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केल्या प्रकरणी मडगाव पोलीस स्थानकावर दोघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॅन्युएल डिकॉस्ता आणि सॅम्सन फर्नाडिस अशी संशयित आरोपींची नावे असून ते धर्मापुर येथील रहिवाशी आहेत

(12 lakh extortion in goa on the pretext of giving a job abroad)

Fraud Case
Smriti Irani Case| स्मृती इराणी यांच्या पतीवर गिरीश चोडणकर यांचे आरोप

या दोघांनी एका कडून 12 लाख रुपये घेऊन विदेशात नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते . मात्र त्याला नोकरी देण्यात आली नाही या प्रकरणी त्या इसमाने मडगाव पोलीस स्थंलात या दोघांविरुद्ध तक्रार दाखल,केली होती . या दोघांविरुद्ध भा द स ४२० कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विभावरी गावकर पुढील तपास करीत आहेत.

शंभरहून अधिक लोकांना सात करोड रुपयांना गंडा

शंभरहून अधिक लोकांना सात करोड रुपयांना गंडा घालून गेलेल्या नूर अहमद या ठकसेनाला आजपर्यंत अटक न झाल्याने तसेच त्याचा कोणाताच थांगपत्ता नसल्याने लाखो रुपये देऊन फसलेल्या लोकांनी वास्को पोलिस स्थानकांत धाव घेऊन त्या ठकसेनाला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com