Old Goa : गोवा पुन्हा हादरला! कांदोळीनंतर चोडणमध्ये पित्यानेच केला मुलीचा खून

12 वर्षीय मुलगी तीन दिवसांपासून होती बेपत्ता
father killed daughter
father killed daughterDainik Gomantak

Old Goa : काही दिवसांपूर्वी कांदोळी येथे एका पित्याने पोटच्या दोन मुलांचा गळा आवळून खून करत स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याचा दुर्देवी प्रकार समोर आला होता. असाच एक धक्कादायक प्रकार जुने गोवे येथील चोडणमध्ये उघडकीस आला आहे. चोडणमध्ये मानसीच्या परिसरात एका 12 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी तिच्या वडिलांना जुने गोवे पोलिसांनी अटक केली आहे.

father killed daughter
Mormugao Crime : धक्कादायक ! 24 वर्षीय युवकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

जुने गोवे येथील चोडणमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चोडणमध्ये मानसी परिसरात हा प्रकार संध्याकाळी उघडकीस आला होता. मानसी परिसरात एका 12 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. मृत मुलगी गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होती. याप्रकरणाचा तपास जुने गोवे पोलिसांकडून सुरु होता. अवघ्या काही तासांतच जुने गोवे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत संशयित आरोपीस अटक केली आहे. 12 वर्षीय मुलीचा तिच्या पित्यानेच खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोहम्मद सलीम (34) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी तिच्या पित्यालाच अटक केली आहे.

father killed daughter
Candolim Murder Case: कांदोळीतील 'ते' हत्याकांड कौटुंबिक वादातून! पोलिसांचा प्राथमिक अंदाज

कांदोळी येथे एका पित्याने पोटच्या दोन मुलांचा गळा आवळून खून करत स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. ओर्डा-कांदोळी येथे शनिवारी रात्री उशिरा याबाबतची माहिती उघडकीस आली होती. या हत्‍याकांडामुळे संपूर्ण गोवा हादरून गेला होता. जॉय फर्नांडिस असे हत्या केलेल्या बापाचे नाव आहे. तर मुलगी अनानिया (13) आणि मुलगा जोसेफ (8) अशी मुलांची नावे आहेत. जॉय फर्नांडिस हा गेल्या 8 वर्षांपासून बेरोजगार होता तसेच जॉय व त्याचा पत्नीमध्ये कौंटुबिक वाद होत होते अशी जबानी जॉय फर्नांडिस याच्या पत्नीने पोलिसांना दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com