१२५ कोरोनामुक्त, तर ५२ पॉझिटिव्‍ह

corona possitive
corona possitive

पणजी :

राज्‍यात सोमवारी १२५ जण कोरोनामुक्त झाले, तर ५२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्‍या ७४५ झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. सोमवारी १२५ देशी प्रवाशांना घरी क्वारंटाईन केले. १२४२ जणांच्या लाळेचे नमुने कोरोना पडताळणी चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्‍यापैकी १२३९ जणांचे अहवाल हाती आले आणि ३६६ जणांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत.
आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, एकूण रुग्णांमध्ये रेल्वे, रस्‍ता आणि विमानमार्गे आलेल्या ११३ जणांचा समावेश आहे, तर मांगोरहिल परिसरातील ९९ आणि मांगोरहिलसंबंधित २३८ रुग्ण आहेत. मडगाव येथे २२ रुग्ण, केपेत १२, लोटलीत ५, नावेलीत २, गंगानगर - खोर्ली म्हापसा येथे ७, साखळीत ४३, काणकोणात ६, पर्वरीत ४, राय येथे २, वेर्णा येथे ९, वाळपईत १०, पेडणेत ८, सांगेत ३ रुग्ण आणि इतर ठिकाणच्या रुग्णांचा समावेश आहे.


संसर्गस्‍थळे संख्या
सडा ७०
चिंबल ३१
कुडतरी ३१
बायणा ७२
मोर्ले २२
झुआरीनगर ९८
खारेवाडा ३१

काही दिवसांपूर्वी अग्निशमन दलात काम करणाऱ्या एका व्यक्तीला सुटीच्या कालावधीत ताप आला होता. तेव्हा ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. मग, येथील इतर लोकांच्या चाचण्या केल्यानंतर आता आणखी चौघे पॉझिटिव्ह आल्याचे अहवालातून समोर आले आहे. आता यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या चाचण्या केल्या जात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com