अभ्यासाला लागा..गोवा बोर्डाची बारावीची परीक्षा २६ एप्रिलपासून

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

बारावी वर्गाची प्रात्यक्षिक परीक्षा १ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. बारावीची लेखी परीक्षा २६ एप्रिलपासून घेण्यात येणार आहे.

पणजी :  बारावी वर्गाची प्रात्यक्षिक परीक्षा १ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. बारावीची लेखी परीक्षा २६ एप्रिलपासून घेण्यात येणार आहे. सध्या राज्यात दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु आहेत. त्यापैकी बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज जाहीर केले.

मंडळाने जारी केलेल्या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेचे वेळापत्रक असे  २७ एप्रिल- अकौंटंसी, भौतिकशास्त्र, इतिहास. २८ एप्रिल- ऑटोमोबाईल, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य निगा, रिटेल, ब्युटी व वेलनेस, बांधकाम, दूरसंचार, माध्यम व करमणूक, लॉजिस्टीक व्यवस्थापन,पर्यटन व आतिथ्यशीलता. २९ एप्रिल- गणित, गणित व सांख्यिकी, राज्यशास्त्र. ३० एप्रिल- सचिवकला. ३ मे - इंग्रजी (१), मराठी (१). ४ मे - रसायनशास्त्र, बिझनेस स्टडी, ५ मे- बेकींग, तर्कशास्त्र, संगणक विज्ञान, सहकार. ६ मे- अर्थशास्त्र. ७ मे - जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र. ८ मे - कोकणी (दोन). १० मे- मानसशास्त्र, कुकरी. ११ मे - पोर्तुगीज भाषा (दोन), इंग्रजी (दोन), उर्दू (दोन), संस्कृत (दोन), फ्रेंच (दोन) व पेंटींग. १२ मे - हिंदी  (दोन). १३ मे - मराठी (दोन). १५ मे - भूगोल. 

ऑनलाईन परीक्षेस परवानगी

राज्य सरकारने पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यास परवानगी दिली आहे. तिसरी ते आठवीपर्यंतची परीक्षा ही घरातूनच उत्तरपत्रिका लिहून घेण्याच्या पद्धतीने घेतली जाणार आहे. पहिली व  दुसरीची परीक्षा राज्य शैक्षणिक संशोधन परीषदेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार घेतली जावी असे परिपत्रक शिक्षण खात्याने जारी केले आहे. नववी व अकरावीच्या परीक्षा गोवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सूचनेनुसार घेतली जावी अशी सूचनाही खात्याने शाळांना केली आहे.

 

अधिक वाचा :

गोव्यात मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी, आंबा आणि काजू बागायतदारांचं नुकसान होण्याची शक्यता

नॅशनल गेम निमित्त पणजीतील स्विमिंग पूलची पाहणी 

मेळावली आंदोलनकर्त्यांना पाठींबा देण्यासाठी पोलिस मुख्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांची धड

संबंधित बातम्या