गोव्यातील 13 दवाखाने बंद; साडेतीन लाख कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे वळणार

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 28 एप्रिल 2021

राज्य सरकारने कामगार विमा योजनेंतर्गचे 13 दवाखाने बंद करण्याचा आदेश दिल्याने आता प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील ताण वाढणार आहे. साडेतीन लाखजण कामगार विमा योजनेंतर्गत या दवाखान्यांचा लाभ घेत होते.

पणजी : राज्य सरकारने कामगार विमा योजनेंतर्गचे 13 दवाखाने बंद करण्याचा आदेश दिल्याने आता प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील ताण वाढणार आहे. साडेतीन लाखजण कामगार विमा योजनेंतर्गत या दवाखान्यांचा लाभ घेत होते. आता हे साडेतीन लाखजण प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे वळणार आहेत.(13 hospitals in Goa closed under Kamgar Bima Yojana)

प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या कोविड चाचणीचे नमुने घेण्यात येतात, कोविड लसीकरण केले जाते. त्यासाठी मोठ्या रांगा लागत आहेत. त्यात आता कामगार विमा योजनेचे लाभार्थी उपचारासाठी सरकारी आदेशानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे वळणार असल्याने तेथे मोठी गर्दी उसळणार आहे. मडगावचे कामगार विमा योजनेंतर्गतचे इस्पितळात पुन्हा एकदा कोविड इस्पितळात म्हणून अधिसूचित केले आहे. गोव्यात कोविड19 च्‍या संसर्गाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्याची सोय याच इस्पितळात सर्वांत आधी करण्यात आली होती.

गोवा: सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्यांवर कलंगुट पोलिसांची धडक कारवाई 

रुग्णांवर यशस्वी उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पहिल्या पथकात भूलतज्ज्ञ डॉ.ग्लाडवीन फर्नांडिस, छातीरोगतज्ज्ञ डॉ. राहुल प्रभुदेसाई, डॉ, मारूती नाईक, डॉ. फ्रान्‍सिस्‍को परेरा, डॉ. लॉरा डिसोझा, डॉ. श्वेता लोटलीकर, डॉ. नंदिता रावत, डॉ. संगम नाडकर्णी व डॉ. फेसिल मिरांडा यांचा समावेश होता. दुसऱ्या पथकात डॉ. विभव गुडे, डॉ. शिल्पा कांबळी, डॉ. रेश्मा खांडेपारकर, डॉ. अनंतप्रज्वता शिरोडकर, डॉ. सुचन गावकर, डॉ. कार्ला ब्रागांझा आणि डॉ. पूनम गावकर यांचा तर तिसऱ्या पथकात डॉ. दीपा नाडकर्णी, डॉ. मार्था फर्नांडिस, डॉ. स्मृती केणी, डॉ गायत्री जाधव, डॉ. विद्या तळेगावकर आणि डॉ. सुलक्षणा नाईक यांचा समावेश होता.

वळपई आठवडा बाजारात नागरिक विसरले सामाजिक अंतराचे भान 

संबंधित बातम्या