महाविद्यालय पदवी ऑनलाईन  प्रवेशासाठी १३ हजार अर्ज 

विलास महाडिक
गुरुवार, 23 जुलै 2020

या ऑनलाइन प्रवेशासाठी अर्ज केलेल्यांना प्रवेश मिळाल्याची पहिली गुणवत्ता यादी ३ ते ४ ऑगस्टला जाहीर होऊ शकते.

पणजी

राज्यातील सरकारी तसेच खासगी महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रवेशाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. ही प्रवेशाची मुदत येत्या २६ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत उच्च शिक्षण संचालनालनाच्या पोर्टलवर अर्ज केलेल्यांची संख्या १३ हजारावर पोहचली आहे अशी माहिती या खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. 
या ऑनलाइन प्रवेशासाठी अर्ज केलेल्यांना प्रवेश मिळाल्याची पहिली गुणवत्ता यादी ३ ते ४ ऑगस्टला जाहीर होऊ शकते. या यादीनंतर दुसऱ्या फेऱ्याची यादी जाहीर होईल. पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्यांसाठी सुरुवातीला प्रवेश शुल्क म्हणून ८५५ रुपये भरावे लागणार आहेत तर उर्वरित शुल्क रक्कम हप्त्याने भरण्याची सुविधा ठेवण्यात येणार आहे. 

 

 

 

संबंधित बातम्या