काणकोणात ऑक्टोबरमध्ये १३६ रूग्ण ‘कोरोना’मुक्त

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

काणकोणात ऑक्टोबर महिन्यात २०८ जणांना करोनाची लागण झाली होती. त्यापैकी १३६ कोरोनामुक्त झाले.

काणकोण :  काणकोणात ऑक्टोबर महिन्यात २०८ जणांना करोनाची लागण झाली होती. त्यापैकी १३६ कोरोनामुक्त झाले. जून ते आतापर्यंत काणकोणात ६५१ जणांना करोनाची लागण झाली. त्यापैकी दहा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर ५७० रुग्ण कोरोनामुक्त झाले. 

काणकोणात सध्या कोरोनाची लागण झालेले ७१ रुग्ण आहेत.'काणकोणात जून महिन्यात बारा, जुलै महिन्यात २९, ऑगस्ट महिन्यात १४१, सप्टेंबर महिन्यात २६१ व ऑक्टोबर महिन्यात २०८ कोरोना रुग्ण सापडले आहेत. ऑगस्ट महिन्यापासून काणकोणात एन्टीजन तपासणी करण्यास सुरवात झाली. त्यामुळे कोरोना रुग्णांचे निदान ताबडतोब होण्यास मदत झाली. आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. वंदना देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली काणकोण सामाजिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, परिचारीका व अन्य कर्मचारी कोरोना रुग्णांना कोरोना काळात मदतीचा हात देत आहेत. गेल्या आठवड्यात काणकोणात कोरोना रुग्णांत घट झाली आहे.

संबंधित बातम्या