गोवा राज्यातील 14 अपघातप्रवण क्षेत्रात सुधारणा

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

गोवा राज्यातील 24 अपघात प्रवण क्षेत्रांपैकी 14 अपघातप्रवण क्षेत्रात सुधारणा करण्यात आलेली आहे. यामुळे आता राज्यात केवळ दहा ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्रे शिल्लक आहेत अशी माहिती वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

पणजी:  गोवा राज्यातील 24 अपघात प्रवण क्षेत्रांपैकी 14 अपघातप्रवण क्षेत्रात सुधारणा करण्यात आलेली आहे. यामुळे आता राज्यात केवळ दहा ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्रे शिल्लक आहेत अशी माहिती वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

मंत्रालयात राज्य रस्ता सुरक्षा परिषदेची बैठक झाली या बैठकीनंतर वाहतूक मंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने दुरुस्त केलेला मोटार वाहन कायदा लवकरात लवकर राज्यात लागू करावा असे मत परिषदेच्या सदस्यांनी बैठकीत व्यक्त केले आहे. दर सहा महिन्यानी या परिषदेची बैठक यापुढे घेण्यावरही शिक्कामोर्तब केले आहे. ज्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करणे शक्य नाही त्या ठिकाणी उन्नत मार्ग किंवा उड्डाणपूल बांधून प्रश्न सोडवावा अशी शिफारस सरकारला करण्याचे ठरवण्यात आले आहे . वाहतूक मंत्र्यांनी सांगितले की अपघात प्रवण क्षेत्र कमी करण्यासाठी रस्ता रुंदीकरण, गतिरोधक चालणे, स्वयंचलित वाहतूक नियंत्रण दिवे बसवणे आदी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

गेल्या सहा महिन्यात चौदा ठिकाणी अशा उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. दहा ठिकाणी पुढील सहा महिन्यात अशा उपाययोजना केल्या जातील. महामार्ग व रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे आणखीन काही प्रश्न उपस्थित होणार आहेत त्याचा अभ्यास परिषद करणार असून सरकारला त्यासंदर्भातील शिफारशी केल्या जातील.

हुकुमशहांची नावं M अक्षरापासूनच का सुरू होतात? राहूल गांधींनी केला मजेशीर प्रश्न -

संबंधित बातम्या