एकाच कुटुंबातील १४ जण कोरोना संक्रमित!

Tukaram Govekar
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

बाळ्ळी - वेळीपवाड्यावर एकाच कुटुंबातील १४ जण सोमवारी कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आल्याने या भागात खळबळ माजली आहे.

नावेली

या वाडयावर एकूण १६ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. पैकी एक रुग्ण बरा होऊन घरी परतला असून इतर सर्वजण कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
यात अकरा महिन्याच्या एका लहान मुलाचा समावेश आहे. तसेच इतर सात मुले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच यात दोन ते १४ वर्षे वयोगटातील मुले आहेत, तर एक सुमारे ६५ वर्षांची महिला आहे. काहींना शिरोडा कोविड सेंटरमध्ये, तर काहींना फर्मागुढी येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या