Dabolim: चिमुरडीचा जन्मदात्रीनेच घोटला गळा कारण...

चिमुरडीला ठार करत आईने ही केला आत्महत्येचा प्रयत्न
Dabolim crime News
Dabolim crime News Dainik Gomantak

वास्को: आज सकाळी चिखली दाबोळी येथे एका 14 महिन्यांच्या चिमुरडीची तिच्या आईनेच घरात हत्या केल्याची घटना घडली आहे. संशयित आरोपी आईने मूलीची हत्या केली व यानंतर झुआरी पुलावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या जवळच असलेल्या एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तीला वाचवले व पोलिसांच्या स्वाधीन केले. सद्या शयित आरोपी आईवर गोमेकॉत उपचार चालू आहे.

(14-month newborn girl was killed by her mother in vasco )

सविस्तर वृत्त असे की, चिखली दाबोळी येथे जन्मदात्या आईनेच आपल्या 14 महिन्यांच्या मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना दाबोळी चिखली परिसरात शनिवारी घटना घडली आहे. संशयित आई निमीषा गोनी (वाल्सन) (वय 38 ) हिने आपल्या 14 महिन्यांच्या मुलीचा खून केल्याचा प्रकार घडला आहे.

Dabolim crime News
राज्यातील अभयारण्य विकसित करणार; विश्वजीत राणे

मुलीचा खून केल्यानंतर आईने झुआरी पूलावरुन उडी घेत मांडवीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. दिलिप बिल्डकॉन लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला वाचवले व तिला आगशी पोलिसांच्या ताब्यात दिले.

Dabolim crime News
Goa Election : आचारसंहिता लागू, तरीही योजनांच्या घोषणा!

दरम्यान, आगशी पोलिसांनी वास्को पोलिसांना याबाबत माहीती देताच वास्को पोलीसांनी महिलेच्या राहत्या घरी दाखल होत, अधिक चौकशी केली असता पोलिसांना तिच्या बेडरूममध्ये मृत बालक आढळले. काही दिवसांपूर्वी जर्मनीवरुन परतलेली निमीषा गोनी (वाल्सन) व तिची 18 महिन्यांची मुलगी चिखली परिसरात राहत होती.

14 महिन्यांच्या मुलीला ठार करत आईने स्वत:च्या हाताला ईजा केली आहे. मात्र संशयित महिलेला पोलिसांनी अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तर मृत मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. तर संशयित महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com