कदंबच्या ताफ्यात आणखी 15 ई-बसेसचा समावेश

ई-बसेस पणजी ते मडगाव शटल मार्ग आणि आंतरराज्य मार्गावर चालवल्या जातील.
कदंबच्या ताफ्यात आणखी 15 ई-बसेसचा समावेश
e-buses Dainik Gomantak

पणजी: सरकारी मालकीच्या कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड (KTCL) ने सध्याच्या ई-बसच्या ताफ्यात आणखी 15 इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट केल्या आहेत. (15 more e-buses added to KTC's fleet in Goa)

e-buses
आगोंदमध्ये बिबट्यांचा वाढला वावर

महामंडळाने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये 32-34 आणि 52-54 आसनक्षमता असणा-या 500 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा आणि दैनंदिन देखभाल करण्यासाठी खाजगी कंपन्यांकडून निविदा मागवल्या होत्या. कॉर्पोरेशनने नंतर हैदराबाद-आधारित Evey Trans Pvt Ltd ला कंत्राट दिले होते आणि वर्षाच्या अखेरीस 100 ई-बस वितरित करण्याचे आदेश दिले होते.

महामंडळाने राज्यातील उपनगरे आणि ग्रामीण भागात तसेच शेजारील राज्यांच्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर लक्झरी आणि स्लीपर कोच म्हणून या नवीन ई-बस चालवण्याची योजना आखली आहे. या बसेस पणजी ते मडगाव (Margao) शटल मार्ग आणि आंतरराज्य मार्गावर चालवल्या जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.