डिचोलीत नवीन १५ कोरोनाबाधितांची नोंद

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

डिचोली विभागात १० आणि मये विभागात ५ रुग्ण आढळले. कोरोना बाबतीत  हॉटस्पॉट ठरलेल्या साखळी  विभागात मात्र सोमवारी  एकही रुग्ण आढळला नाही.

डिचोली - डिचोली तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा घटत असून,आज सोमवारी दिवसभरात तालुक्यात १५ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. डिचोली विभागात १० आणि मये विभागात ५ रुग्ण आढळले. कोरोना बाबतीत  हॉटस्पॉट ठरलेल्या साखळी  विभागात मात्र सोमवारी  एकही रुग्ण आढळला नाही. अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून उपलब्ध झाली आहे.

सोमवारी डिचोली विभागात ८९ मये विभागात ८३ आणि साखळी विभागात १५६ मिळून तालुक्यात एकूण ३२८ कोरोनाचे सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. सोमवारी मयेत १ आणि साखळीत १९ मिळून तालुक्यात २० रुग्ण बरे झाले आहेत. डिचोलीत मात्र एकही रुग्ण बरा झालेला नाही, अशी  माहिती मिळाली आहे. तालुक्यातील ६३ रुग्ण कोविड सुविधा केंद्रात उपचार घेत आहेत, तर डिचोलीत - ६७, मयेत - ६७ आणि साखळीत - ११३ मिळून २३७ रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. डिचोलीतील ८, मयेतील ७ आणि साखळीतील १३ मिळून तालुक्यातील २८ रुग्णांवर अद्यापही कोविड रुग्णालयात उपचार चालू आहेत, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून मिळाली आहे.

संबंधित बातम्या