सकारात्मक..! रविवारच्या चाचण्यांमागे राज्यात केवळ १५ टक्के पॉझिटिव्ह

15 percent patients found positive out of total in goa
15 percent patients found positive out of total in goa

पणजी- राज्यात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या कमी झाली असली तरी ती कोरोना पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांचीही संख्या कमीच झाली आहे. रविवारी १ हजार २४६ जणांचे नमुणे चाचण्यांसाठी घेण्यात आले. त्यापैकी १८७ जण पॉझिटिव्ह आढळले. म्हणजे केवळ १५ टक्के लोक पॉझिटिव्ह असल्याचा निष्कर्ष निघतो. दरम्यान, मागील चोवीस तासांत ६ जण दगावले असून, मृतांची संख्या साडेपाचशेज्याजवळ (५४४) पोहोचली आहे. 

राज्यातील कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. आज ती ८९.६७ एवढी टक्केवारी नोंदली गेली आहे. त्यात आत्तापर्यंतच्या ४० हजार ५८७ रुग्णांपैकी ३६ हजार ३९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मागील चोवीस तासांत ३६० जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी जाण्यास मुभा दिली आहे. घरगुती विलगीकरणात राहण्यासाठी ११५ जणांना आज अनुमती मिळाली आहे. त्यामुळे अशाप्रकारे उपचार घेणाऱ्यांची संख्या २० हजार ३१ पर्यंत गेली आहे. त्याशिवाय आज ५२ जणांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. राज्यात ॲक्टिव पॉझिटिव्ह असलेल्यांची संख्या ३ हजार ६४८ एवढी आहे. 

मागील चोवीस तासांत दगावलेल्या सहा जणांमध्ये कुडतरी येथील ६८ वर्षीय पुरुष, कुठ्ठाळी येथील ३९ वर्षीय पुरुष, पेडणे येथील ७५ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय पुरुष (सिंधुदुर्ग), सांगे येथील ५१ वर्षीय पुरुष आणि वास्को 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com