Goa BJP: डिचोलीतील 15 क्षयरोग रुग्ण भाजपकडून दत्तक!

Goa BJP activity: सेवा पंधरवड्यानिमित्त भाजपच्या वैद्यकीय विभागाचा अनोखा उपक्रम
Goa BJP activity
Goa BJP activityDainik Gomantak

Goa BJP activity: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त भाजपच्या वैद्यकीय विभागातर्फे राज्यातील क्षयरोग (TB) रुग्णांना दत्तक घेण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. त्‍याअंतर्गत आज बुधवारी डिचोलीत आयोजित विशेष कार्यक्रमात मतदारसंघातील 15 क्षयरोग (टीबी) रुग्णांना दत्तक घेण्यात आले.

डिचोलीच्या सामाजिक आरोग्यकेंद्रात झालेल्‍या या कार्यक्रमात आरोग्याधिकारी डॉ. मेधा साळकर आणि नोडल अधिकारी डॉ. विद्या गाड यांच्याकडे दत्तक घेतलेल्या 15 रुग्णांसाठी जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.

दरम्‍यान, या कार्यक्रमास माजी सभापती राजेश पाटणेकर, नगराध्यक्ष कुंदन फळारी, भाजपच्या वैद्यकीय विभागाचे निमंत्रक डॉ. शेखर साळकर, भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास गावकर, ज्येष्ठ कार्यकर्ते वल्लभ साळकर, डॉ. कौस्तुभ पाटणेकर, अभिजित तेली, अरुण नाईक तुळशीदास परब, मकरंद परब आदी उपस्थित होते.

तसेच, येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात मिळून जवळपास 750 क्षयरोग रुग्णांना दत्तक घेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. दत्तक घेणाऱ्या रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून सहा महिन्यांपर्यंत त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात येतील.

पाच ठिकाणी मिशन फक्ते: वेळ्‍ळी, कुडतरी, पणजी, ताळगाव आणि डिचोली मतदारसंघात 100 टक्के टीबी रुग्णांना दत्तक घेण्याची संकल्पपूर्ती झाली आहे, असे डॉ. शेखर साळकर यांनी सांगून त्याबद्दल समाधान व्यक्त केले. डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत मये मतदारसंघात 15 रुग्ण आहेत, असे स्‍पष्‍ट केले.

दत्तक घेणारे दानशूर: क्षयरोग रुग्णांना दत्तक घेतलेल्‍यांमध्‍ये अभिजित तेली, डॉ. कौस्तुभ पाटणेकर, अरुण नाईक, राजेश पाटणेकर, वल्लभ साळकर, डॉ. शेखर साळकर, कुंदन फळारी, सचिन साळकर, विश्वास गावकर, अनिकेत चणेकर आणि तुळशीदास परब यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com