rice.jpg
rice.jpg

कुर्टी - फोंड्यात मुदतबाह्य  150 तांदळाच्या पिशव्या ताब्यात

फोंडा (गोवा)  : नागझर कुर्टी (nagzar curti) - फोंड्यात (Ponda) वजन मापे खात्याच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी घातलेल्या छाप्यात मुदतबाह्य (Expired) 150 तांदळाच्या पिशव्या ताब्यात घेतल्या. ‘सुंदर ट्रेडर्स’ या आस्थापनावर छापा टाकून कारवाई (Action) करण्यात आली. तारीख उलटून गेलेली कालबाह्य तांदळाच्या पिशव्यांची विक्री होत असल्याचा सुगावा लागल्याने वजन मापे खात्याने फोंडा भागात मोहीम सुरू केली होती. त्यात नागझर कुर्टी येथील ‘सुंदर ट्रेडर्स’ या आस्थापनात वितरणासाठी या पिशव्या ठेवण्यात आल्‍याचे आढळले. वजन मापे खात्याचे साहाय्यक नियंत्रक देमू मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आला. अधिक तपास खात्याचे  अधिकारी करीत आहेत.(150 bags of expired rice were seized in Ponda)

आणखी वाचा 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com