बनावट कॉल सेंटरप्रकरणी जुने गोवेत 16 जणांना अटक

Cyber Crime Complaint : विदेशी नागरिकांना लुटणारी टोळी जुने गोवेमध्ये जेरबंद; आठ महिलांचा समावेश, 14 लॅपटॉपसह 8 मोबाईल्स जप्त
बनावट कॉल सेंटरप्रकरणी जुने गोवेत 16 जणांना अटक
Cyber Crime ComplaintDainik Gomantak

पणजी : सायबर क्राईम कक्षाने जुने गोवे येथील सनशाईन स्कूलजवळ एका बंगल्यामध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. या कारवाईत या सेंटरचा प्रमुख सूत्रधार महम्मद रामीज एम. घान्ची ऊर्फ रॉय फर्नांडिस (32, गुजरात) याच्यासह इतर 8 पुरुष व 8 महिला कर्मचारी मिळून 16 जणांना अटक केली. तसेच 14 लॅपटॉप, 8 मोबाईल तसेच इतर साहित्य जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक राहुल परब यांनी दिली.

यासंदर्भात सायबर क्राईम कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुने गोवे येथे बनावट कॉल सेंटर सुरू असल्याची खबर त्यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर काल मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मुख्य सूत्रधार महम्मद घान्ची ऊर्फ रॉय फर्नांडिस याने जुने गोवे येथे भाडेपट्टीवर एक बंगला घेऊन तेथे कॉल सेंटर स्थापन केले होते. (Goa Cyber Crime Complaint)

Cyber Crime Complaint
वनप्राण्‍यांसाठी जंगलात हवेत कृत्रिम तलाव!

अटक केलेल्या सर्व संशयितांविरुद्ध भादंसंच्या कालम 419, 420 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 सी व 66 डी खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. या गुन्ह्यामध्ये आणखी काहीजण गुंतले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जप्त करण्यात आलेल्या मोबाईल्स व लॅपटॉपमधून या कॉल सेंटरवरून संशयितांनी किती जणांची फसवणूक केली आहे याचा शोध घेण्यात येत आहे. संशयितांच्या प्राथमिक चौकशीनंतर यामध्ये सामील असलेल्या इतर तरुणींची माहिती मिळाल्यावर त्यांनाही अटक केली आहे.

ॲमेझॉनच्या नावाखाली गंडा

या कॉल सेंटरचा वापर करून मुख्य सूत्रधार व या सेंटरवर कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांनी ते ॲमेझॉन ऑपरेटर असल्याचे परदेशी नागरिकांना लक्ष्य केले होते. त्यांनी अमेरिकेच्या नागरिकांनाविदे 500 ते 100 यूस डॉलर्सपर्यंतच्या गिफ्ट कार्डची सविस्तर माहिती पाठविल्यास त्यांच्या हॅक केलेल्या त्यांच्या ॲमेझॉन वॉलेट खात्यात पुन्हा त्यांची रक्कम जमा केली जाईल, असे सांगून अनेकांना लुटले असल्याचे प्राथमिक चौकशीत उघडकीस आले आहे.

सावधगिरीचे पोलिसांचे आवाहन

ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ॲमेझॉनचा वापर करून बनावट कॉल करणाऱ्या सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला आहे. अशा विविध संस्थांच्या ऑनलाईनवरून वस्तू खरेदी करताना लोकांनी त्याची सत्यसत्यता पडताळून पाहावी. कॉल सेंटरवरून कॉल आल्यास त्या कंपनीच्या गिफ्ट कार्डची माहिती देताना सावधगिरी बाळगावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com