गोव्यात परिवहन विभागाच्या 16 ई-सेवा सुरू

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 9 जून 2021

वाहतूक खात्यातील विविध परवान्यांसाठी वाहनचालकांचे हेलपाटे कायमचे बंद करण्यासाठी नवीन 16 ई सेवा(16 services) सुरू केली असून येत्या शुक्रवारपासून ती पूर्णपणे उपलब्ध होणार आहे.

पणजी: वाहतूक खात्यातील विविध परवान्यांसाठी वाहनचालकांचे हेलपाटे कायमचे बंद करण्यासाठी नवीन 16 ई सेवा(16 services) सुरू केली असून येत्या शुक्रवारपासून ती पूर्णपणे उपलब्ध होणार आहे. या सेवेमुळे वाहनचालकांना घरबसल्या ऑनलाईनद्वारे(Online) शुल्क जमा करून सेवा उपलब्ध होणार आहे. खात्याच्या सुमारे 174 विविध सेवा असून त्या टप्प्याटप्प्याने डिजीटलाईज्ड करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो(state transport minister Mauvin Godinho) यांनी दिली. (16 E services of transport department launched in Goa)

सध्या कोरोना महामारीच्या काळात वाहन चालकांना वाहतूक खात्याकडे येण्याची गरज भासू नये तसेच भविष्यातही परवान्यांसाठी कार्यालयात यावे लागू नये यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘एनआयसी’च्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करण्यासाठीचे काम सुरू होते. अपघातात मृत्यू झालेल्या व सहाय्य नसलेल्या कुटुंबियांना घटकराज्यदिनी 2 लाखांची मदत तथा अर्थसहाय्य रस्ता अपघातातील मयताच्या कुटुंबियासाठी गोवा राज्य अंतरिम भरपाई योजनेखाली देण्यात येते. 59 कुटुंबांना ही भरपाई देण्यात आली. 

तर टॅक्सीचालकांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल: वाहतूकमंत्री  

अपघातात मृत्यू पावलेल्या कुटुंबियांकडून या आर्थिक सहाय्यच्या मदतीसाठी अर्ज करण्याची मुदत ही 6 महिने होती ती आता एक वर्षापर्यंत वाढविण्यात आली आहे. ही योजना 2013 मध्ये अधिसूचित करण्यात आली होती. मात्र काही कुटुंबांना या योजनेबाबत व मुदतीसंदर्भात कल्पना नसल्याने काही भरपाई दावे अर्ज बाजूला ठेवण्यात आले होते. अशा अर्जांची संख्या अधिक आहे त्यामुळे त्यांना संधी मिळावी म्हणून ही मुदत वाढविण्यात आल्याचे गुदिन्हो म्हणाले. 

विदेशी पर्यटकांना गोव्यात रस्त्यावर भीक मागावी लागतेय; जाणुन घ्या काय आहे प्रकरण 

पावसाळापूर्व कामासाठी पंचायतींना खर्चाचे अधिकार
पूर्वपावसाळ्यातील कामांसाठी लहान पंचायतींना 2 लाख तर मोठ्या पंचायतींना 5 लाखांपर्यंत खर्च करण्याचे अधिकार राज्य सरकारने दिले आहेत. तसेच कोरोना महामारीच्या काळात अडचणीत असलेल्या कुटुंबांना सामानाची मदत करण्यासाठी या रक्कमेतून खर्च करण्यास मुभा देण्यात आली आहे. पावसाळ्यात पूरसदृश्‍य स्थिती उद्‍भवल्यास त्यासाठीची ही रक्कम खर्च करण्यास अधिकार दिले गेले आहेत. पंचायत क्षेत्रातील घरपट्टीत वाढ करण्यासंदर्भातची फाईल येत्या काही दिवसांत हातावेगळी केली जाईल असे आश्‍वासन पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिले. 

उपलब्ध ऑनलाईन ई सेवा 

 1. नवीन सामान परमिट  
 2. परमिटाचे नूतनीकरण 
 3. परमिटाचे नूतनीकरण नकलप्रत
 4. नवीन परमिट एनपी प्रमाणितसह 
 5. परमिट नूतनीकरण एनपीसह
 6. नवीन हंगामी परमिट 
 7. नकली परमिट 
 8. ऑल इंडिया पर्यटन बस परमिट 
 9. ऑ इंडिया टुरिस्ट मॅक्सी कॅब परमिट 
 10. ऑल इंडिया टुरिस्ट टॅक्सी परमिट 
 11. स्पेशल परमिट 
 12. परमिट रद्द करणे 
 13. परमिट ट्रान्सफर करणे 
 14. नकली हंगामी प

संबंधित बातम्या