बंडखोर आमदारांचा गुवाहाटीनंतर गोव्यात मुक्काम; संध्याकाळपर्यंत होणार दाखल

बंडखोर आमदार गोव्यात हॉटेल ताजमध्ये उतरणार असून, बहुमत चाचणी साठी उद्या सकाळी ते गोव्यातून मुंबईला रवाना होतील.
Rebel MLA's of the Shiv Sena
Rebel MLA's of the Shiv SenaDainik Gomantak

गोवा: महाराष्ट्रातील राजकारण वेगाने बदलत आहे. यातच आता शिवसेनेतील बंडाळीनतंर पडद्याआडून रणनीती राखणाऱ्या भाजपने राज्यपालांची भेट घेऊन सत्तेसाठी दावा केला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव सरकारला उद्या सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. याच पार्श्र्वभुमीवर महाराष्ट्रात सध्या सर्वत्र चर्चेत असणाऱ्या शिवसेनेचे बंडखोर आमदार आज तीन वाजेपर्यंत गोव्यासाठी रवाना होणार आहेत.

(16 rebel shivsena MLAs will arrive in Goa by this evening)

Rebel MLA's of the Shiv Sena
पर्यावरण हितासाठी मातीच्या गणेशमूर्ती बनवा : राकेश साळगावकर

बंडखोर आमदार आज दुपारी गोव्याला रवाना होणार आहेत

आज दुपारी 3.30 च्या सुमारास बंडखोर आमदार गोव्याला रवाना होणार असून तेथून ते उद्या मुंबईला रवाना होतील. म्हणजे बंडखोर आमदार आधी गोव्यात जाऊ शकतात, तिथून मग मुंबईत येतील.

गोव्यात हाचालींना वेग

बंडखोर आमदार गोव्यात हॉटेल ताजमध्ये उतरणार असून, बहुमत चाचणी साठी उद्या सकाळी ते गोव्यातून मुंबईला रवाना होतील. गोव्यातील ताज विवांता या हॉटेलमध्ये या आमदारांसाठी तब्बल 70 रूम बुक करण्यात आलेल्या आहेत. पहिल्यांदा गुजरात त्यानंतर आसाम आणि आता शेवटचा दौरा हा गोव्याचा असून, उद्या सकाळी ते मुंबईत दाखल होतील. आश्चर्याची बाब म्हणजे, तीनही भाजप शासित राज्यात या आमदारांना हालवण्यात आले आहे. उद्या सकाळी 11 च्या आधी ते मुंबईत दाखल होण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

शिंदे गट उद्या मुंबईत फ्लोर टेस्टसाठी जाणार

बंडखोर आमदारांसह कामाख्या देवी मंदिरात दर्शनासाठी आलेले नाथ शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. उद्या आमचे सर्व आमदार फ्लोर टेस्टसाठी मुंबईला जाणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. राज्यपालांनी सरकारला विशेष अधिवेशन बोलावण्यास सांगितले आहे.

फडणवीस यांच्या दिल्लीत भेटी

महाराष्ट्राच्या महाभारतात भाजप उघड्यावर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव सरकारला उद्या सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री राज्यपालांची भेट घेऊन फ्लोर टेस्टची मागणी केली. आदल्या दिवशी फडणवीस यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती.

Rebel MLA's of the Shiv Sena
गोमेकॉसमोरील गाळे विक्रेत्‍यांना मोफत का द्यायचे?

उद्या सकाळी 11 वाजता फ्लोअर टेस्टची व्यवस्था

राज्यपालांनी विधानसभा सचिवांना पत्र लिहून उद्या सकाळी 11 वाजता फ्लोअर टेस्टची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. राज्यपालांनी त्यांच्या पत्रात बहुमत चाचणीसाठी तीन कारणे दिली आहेत.

पहिला आधार

राज्यपाल म्हणाले- 7 अपक्ष आमदारांनी मला पत्र लिहून म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी बहुमत गमावले आहे, त्यामुळे फ्लोर टेस्ट घेणे आवश्यक आहे.

दुसरा आधार

राज्यपाल म्हणाले- शिवसेनेचे सुमारे 40 आमदार त्यांना सोडून गेल्याचे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सतत प्रसिद्ध होत आहे.

तिसरा आधार

राज्यपाल म्हणाले- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सरकारकडे बहुमत नसल्याची माहिती दिली. अशा परिस्थितीत कोणतीही अलोकतांत्रिक कृती होऊ नये, म्हणून बहुमत चाचणी आवश्यक आहे.

यासोबतच बहुमत चाचणीच्या वेळी विधानभवनाच्या बाहेर आणि आत कडेकोट बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना राज्यपालांनी दिल्या आहेत. सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यास सांगितले आहे. फ्लोअर टेस्ट खुली असेल, म्हणजेच प्रत्येक आमदार सरकारच्या समर्थनार्थ असो वा विरोधात हात वर करून मतदान करेल.

शिवसेना न्यायालयात जाऊ शकते, मुख्यमंत्री ठाकरे राजीनामा देऊ शकतात

फ्लोअर टेस्ट आल्यास पक्ष न्यायालयात धाव घेणार असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले. कारण काल ​​सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत फ्लोअर टेस्टबाबत कोणताही निर्णय किंवा भाष्य करण्यात आले नाही. जर फ्लोर टेस्टचा मुद्दा आला तर त्यावर सुनावणी करू, असे कोर्टाने म्हटले होते. त्यामुळे उद्या होणाऱ्या फ्लोअर टेस्टपूर्वी शिवसेना कोर्टात जाण्याची शक्यता आहे.

त्याचवेळी, फ्लोअर टेस्टपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले होते की मी फ्लोअर टेस्टसाठी तयार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com