Colvale Jail: कोलवाळ कारागृहातून 18 मोबाईल्स जप्त

आठवड्यात दुसऱ्यांदा छापा : तुरुंगाची सुरक्षा व्यवस्था ढासळत असल्याचे चित्र
 Colvale Jail Goa
Colvale Jail Goa Dainik Gomantak

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात आठवड्याभरात दुसरा छापा टाकण्यात आला असून आजच्या दुपारी तीन वाजता केलेल्या कारवाईत कैद्यांकडे तब्बल 18 मोबाईल संच, ब्लूटूथ, तंबाखू, सिगरेट्स तसेच अंमलीपदार्थ सापडले. या प्रकारामुळे येथील कारागृहाची सुरक्षा व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे, हेच अधोरेखित होते.

सहा दिवसांपूर्वी म्हणजे 5 मार्चला अशाचप्रकारे कारागृहाचे महानिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली छापा मारण्यात आला होता. तेव्हा जवळपास 23 मोबाईल संच सापडले होते. आज कारागृहाचे अधीक्षक गौरीश कुट्टीकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

अंडरट्रायल कैद्यांच्या बॅरेक क्रमांक दोनमधून तब्बल १८ मोबाईल्ससह अनेक चार्जर, हेडफोन्स सापडले. तसेच तंबाखू, गुटखा तसेच इतर अंमलीपदार्थही जप्त करण्यात आले.

 Colvale Jail Goa
Drugs Case: भारतात अमलीपदार्थ जप्तीचे प्रमाण वाढले

सहाय्यक जेलरची बदली

5 मार्चला छाप्यानंतर कारागृहाचे तत्कालीन सहाय्यक जेलर भानुदास पेडणेकर यांची पणजी मुख्यालयात बदली करण्यात आली. कारागृहाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली असता, या प्रकारानंतर त्यांना जबाबदार धरून ही बदली स्वरुपाची कारवाई झाल्याची माहिती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com