पोटच्या गोळ्याचा आईनेच केला घात; आईला अटक

बांबोळी येथील मनोरुग्ण इस्पितळातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर केली कारवाई
Nimisha Valson arrested
Nimisha Valson arrestedDainik Gomantak

वास्को: Bambolim murder: चिखली येथे 18 महिन्याच्या स्वतःच्या मुलीची राहत्या घरात हत्या करण्यात गुंतलेली आरोपी निमीषा वालसन हिला मंगळवारी वास्को पोलिसांनी बांबोळी येथील मनोरुग्ण इस्पितळातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अटक करण्यात आली.

(18 month girl killed at Chikhali accused Nimisha Valson arrested by Vasco police)

माताच बनली पोटच्या गोळ्याची वैरीण

6 ऑगस्ट रोजी एका घटनेत मातेनेच आपल्या पोटच्या गोळ्याची वैरीण बनवून तिची हत्या करण्यात धक्कादायक घटना घडली होती. आपल्या चिमुरडीला मारल्यानंतर या महिलेने झुआरी पुलावरून नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र तेथे काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी तिला वाचवले व तिला इस्पितळात दाखल केले. या घटनेत संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. संशयीत महिलेचे नाव निमिषा गोनी बालसन वय (38) असे आहे.

Nimisha Valson arrested
Vijai Sardesai : विरोधकाची भूमिका समर्थपणे निभावण्यास मी तयार

या महिलेच्या राहत्या घरी पोलिसांनी चौकशी केली असता काही दिवसापूर्वी जर्मनीवरून परतलेली निमिषा 6 ऑगस्ट रोजी आपल्या चिमुरडीला ठार मारल्याचे सर्वत्र वार्ता पसरली. त्यानंतर तिने स्वतःच्या हाताला इजा केली आणि नंतर आत्महत्या करण्याच्या उद्देशाने झुआरी पुलावरून उडी मारली होती. मात्र तिचा प्रयत्न फसला. त्यानंतर तिला बांबोळी येथे मनोरुग्ण इस्पितळात दाखल करण्यात आले होते.

Nimisha Valson arrested
MLA Digambar Kamat: देवाने सांगितल्यामुळे मी काँग्रेस सोडली

आईवर वास्को पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान आरोपी निमिषा बालसन हिला काल मंगळवारी इस्पितळातून डिस्चार्ज दिला असता, वास्को पोलिसांनी तिला इस्पितळातून अटक करण्यात आल्याची माहिती वास्को पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com