गोव्यातील सार्वजनिक गुढीपाडव्याची ‘वंदे मातरम’ ने होणार सांगता

The 18th Public Gudi Padwa Festival organized by Mapusa New Year Welcome Committee will be celebrated
The 18th Public Gudi Padwa Festival organized by Mapusa New Year Welcome Committee will be celebrated

म्हापसा: म्हापसा(Mapusa) नववर्ष स्वागत समिती आयोजित 18 वा सार्वजनिक गुढीपाडवा(Gudi Padwa) उत्सव मंगळवार 13 रोजी पहाटे 6 वाजता म्हापसा येथील टॅक्सी स्थानकावर मर्यादित स्वरूपात साजरा केला जाणार आहे. तत्पूर्वी खोर्ली-म्हापसा येथील सातेरी मंदिरात श्रींसमोर आयोजकांकडून श्रीफळ ठेवले जाईल. तसेच म्हापसा येथील श्री महारुद्र संस्थानात सार्वजनिक गाऱ्हाणे घातले जाणार आहे. (The 18th Public Gudi Padwa Festival organized by Mapusa New Year Welcome Committee will be celebrated)

या कार्यक्रमात गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील व त्यांच्या हस्ते सार्वजनिक गुढी उभारली जाईल. तसेच प्रमुख वक्ता प्रा. अनिल सामंत यांचे यावेळी बोधपर भाषण होणार आहे. ‘वंदे मातरम’ने कार्यक्रमाची सांगता केली जाईल. प्रत्येकाने मास्काचा व सॅनिटायझरचा वापर करावा तसेच सुरक्षित अंतर पाळून या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन वैभव राऊळ यांनी केले आहे.

हळदोणेत उद्या गुढीपाडवा मिरवणूक

हिंदू सांस्‍कृतिक महासंघ हळदोणे आयोजित गुढीपाडवा महोत्सव 13 रोजी साजरा होणार आहे. यानिमित्ताने गुढीपाडवा मिरवणूक पहाटे 6 वाजता सुरू होईल. मिरवणूक रवळघाडी पंचायतन नास्‍नोडा येथून प्रारंभ होऊन पानावर, तीनमानस, किटला, हळदोणे, कारणे, वाळवी, रायतळे, श्री साई मंदिर, भक्ती मंदिर, साईनगर येथे त्यांची समाप्ती होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com