मिरामार किनाऱ्याचे सुशोभित कामाचा पहिला टप्पा पूर्ण

प्रतिनिधी
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड (आयपीएससीडीएल) कंपनीने सुशोभित करण्यासाठी हाती घेतलेल्या कामापैकी पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. 

पणजी:  इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड (आयपीएससीडीएल) कंपनीने सुशोभित करण्यासाठी हाती घेतलेल्या कामापैकी पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. 

अटल मिशन फॉर रीजुव्हिनेशन अॅण्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) या योजनेखाली आयपीएससीडीएल कंपनीने १२ कोटी ८७ लाख ४८ हजार ५८७ रुपये खर्च करून मिरामार किनाऱ्यावरील भाग सुशोभित केला जात पार्कचे काम, त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात लोकांना बसता व फिरता येईल असे ठिकाण असेल आणि चौथ्या टप्प्यात फूड कोर्ट असेल. या ठिकाणी चौपाटीवर आल्याची अनुभूती येईल अशी रचना असणार आहे.
 
पहिला टप्पा जो पूर्ण केला आहे, त्यात नाराळाची झाडे आहेत, तशीच ठेवून त्याभोवती सौंदर्यीकरण केले गेले आहे. या कामाची आमदार बाबूश मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर आणि आयपीएससीडीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वयंदिप्तापाल चौधरी यांनी मंगळवारी दुपारी पाहणी केली होती. त्यानंतर हा परिसर लोकांसाठी खुला ठेवला होता. goa

संबंधित बातम्या