
गोवा पर्यटन विभाग पुरस्कृत वास्को येथील मुरगाव नागरिक शिगमोत्सव समिती आयोजित रोमटामेळ स्पर्धेत पहिले बक्षीस सुयोग शिगमोत्सव मंडळ आडपई, चित्ररथ स्पर्धेचे पहिले बक्षीस महालक्ष्मी नागरिक शिगमोत्सव समिती बांदोडा - फोंडा, लोकनृत्य पहिले बक्षीस सरस्वती कला मंडळ कुर्टी फोंडा यांना प्राप्त झाले, अशी माहिती समितीचे अध्यक्ष तथा आमदार कृष्णा साळकर यांनी वास्को येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सरचिटणीस प्रकाश गावस, समन्वयक शेखर खडपकर, प्रशांत हळदणकर, सल्लागार संतोष खोर्जुवेकर, प्रीतम नाईक, शैलेंद्र गोवेकर, विनोद किनळेकर, नीलम नाईक, अमित भोसले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
रोमटामेळ स्पर्धेचे दुसरे बक्षिस कुडचडे काकोडा शिगमोत्सव समिती, तिसरे खांडेपार शिगमोत्सव समिती फोंडा, चौथे स्वर साई शिगमोत्सव मंडळ म्हापसा, पाचवे मांडलेश्वर मांडगुरु शिगमोत्सव फोंडा, उत्तेजनार्थ डोंगरी शिमगोत्सव मंडळ तिसवाडी, चंद्रेश्वर भुतनाथ शिगमोत्सव मंडळ, शांतादुर्गा शिगमोत्सव मंडळ कळंगुट, सावर्डे शिगमोत्सव मंडळ, पाईकदेव शिगमोत्सव मंडळ सांगे, महालसा नारायण शिगमोत्सव समिती, विशेष पारितोषीक फिटनेस फर्स्ट वास्को.
चित्ररथ स्पर्धेचे दुसरे बक्षीस त्रिवेणी कला संघ दुर्भाट - फोंडा, तिसरे भगवती कला संघ दवर्ली - फोंडा, चौथे श्री बाळगोपाळ कला संस्कृती चिंबल, पाचवे गजानन क्रिएटिव्ह बॉयज करासवाडा - फोंडा, सहावे कुंभारजुवा नागरिक समिती - कुंभारजुवे, सातवे आडपई युवा संघाला प्राप्त झाले.
वेशभूषा स्पर्धेत धनंजय, तनुश्री प्रथम
वेशभूषा वरिष्ठ स्पर्धेत पहिले बक्षीस धनंजय नाईक, खोर्ली, दुसरे अनुष्का मोरजकर खोर्ली म्हापसा, तिसरे शिवा बाळू नाईक, कुर्टी फोंडा, उत्तेजनार्थ शिवलिंग रमेश नाईक, म्हार्दोळ - फोंडा, देव रोहिदास गावडे, खोर्ली, शलाका कांबळी, वास्को, योगराज गावणेकर, शेल्डे गोवा, सनी नाईक, बोरी - फोंडा, रामचंद्र गावणेकर, शेल्डे , ॲंथोनी फर्नांडिस, कुठ्ठाळी.
वेशभूषा कनिष्ठ स्पर्धेत पहिले बक्षीस तनुश्री वाडेकर, बस्तोडा, दुसरे स्वरीत पालेकर, सडा-मुरगाव, तिसरे भूमी अजय उगलेकर, बायणा, उत्तेजनार्थ मयुरी कोरगावकर सडा, नयलीक प्रविण गावडे मार्डोळ फोंडा, आराध्या वैभव पागी, फार्तोडा, यशिका योगेश नाईक फोंडा, मिहीर डिचोलकर, सासमोळे बायणा वास्को, ध्रुव योगेश शेट, नवेवाडे वास्को.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.