Goa Police : गोवा पोलिसांना 2 बुलेटप्रूफ वाहने; मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्‍घाटन

Goa Police : लॅपटॉपचे वितरण; 1.5 कोटीचा खर्च
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

पणजी : राज्यात येणाऱ्या अतिमहनीय राजकीय व्यक्तींसाठी शेजारील राज्यांकडून बुलेटप्रूफ वाहनांसाठी अवलंबून राहावे लागत होते. पोलिस खात्यामध्ये दोन बुलेटप्रूफ वाहने सरकारने आज सुपूर्द केली. त्याचे उद्‍घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पोलिस मुख्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. महिला मदत केंद्रासाठी लॅपटॉपचे वितणही करण्यात आले.

गोव्यासाठी या वाहनांची अत्यंत गरज होती. त्यामुळे त्यांचा समावेश झाल्याने यापुढे शेजारील राज्यांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही, असे ते म्हणाले.

(2 Bulletproof Vehicles to Goa Police)

Goa Police
CM Pramod Sawant : ड्रग्जमुक्तीसाठी कठोर कारवाई; गोवा पोलिसांना निर्देश

बुलेटप्रूफ वाहनांची असलेली आवश्‍यकता लक्षात घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद यांनी 2002 साली दोन वाहने खरेदी केली होती. त्या वाहनांची बुलेटप्रुफची बॉडी बांधण्यासाठी आयआयटी मुंबईकडे गेल्यावर्षी 2021 मध्ये पाठवण्यात आल्या होत्या. या दोन वाहनांच्या किंमतीसह तसेच बुलेटप्रुफ बॉडीसाठी मिळून सुमारे 1.5 कोटी रुपये खर्च आला आहे. या वाहनांमुळे आता कोणत्याही क्षणी राज्य सरकार बुलेटप्रुफ गाडी गोव्यातच उपलब्ध असणार आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलिस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गोवा पोलिस खात्याचा ‘स्पेशल ब्रँच मॅन्युएल’चे तसेच ‘कॉफी टेबल बुक’चे अनावरण करण्यात आले. प्रत्येक राज्यामध्ये स्वतःचे स्पेशल ब्रँच मॅन्युएल तसेच कॉफी टेबल बुक आहे गोव्यातच ते नसल्याने त्याची पूर्तता करण्यात आली.

निर्भया योजनेखाली देशातील पोलिस स्थानकात महिला मदत केंद्रासाठी लॅपटॉपचे वितरण महिला पोलिस उपनिरीक्षकांना करण्यात आले. पोलिस स्थानकात येणाऱ्या महिलांच्या व्यथा व त्यांच्या समस्या जाणून घेऊ त्यांना मदत करणे हा त्यामागील उद्देश आहे. महिला पोलिस अधिकारीच तणावाखाली असलेल्या महिलांच्या समस्या उत्तम प्रकारे समजून घेऊ शकतात.

विशेष सेवेची नोंद

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, गोवा सरकार पोलिसांचा दर्जा वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत आहे. गोवा पोलिस तपासकामात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. याचा सरकारला अभिमान आहे. ‘कॉफी बुक टेबल’मध्ये पोलिसांनी केलेल्या विशेष सेवेची नोंद केली जाणार आहे. पोर्तुगीजकालिन पोलिस ते आतापर्यंत झालेला बदल याचा त्यात समावेश केला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com