ताळगावात दुचाकीची पोलिस जीपला धडक बसून 2 मुले जखमी

झालेल्या अपघातात दोन अल्पवयीन मुले गंभीर जखमी झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ताळगावात दुचाकीची पोलिस जीपला धडक बसून 2 मुले जखमी
2 children were injured when two wheeler hit police jeep in goaDainik Gomantak

पणजी: व्हडलेभाट ताळगाव येथील होंडा सर्विस सेंटर जवळ काल रात्री साडेदहाच्या सुमारास पोलिस जीपला दुचाकीने ठोकर देऊन झालेल्या अपघातात (Accident) दोन अल्पवयीन मुले गंभीर जखमी झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना गोमेकॉ इस्पितळात (GMCH) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी (GOa Police) अपघाताचा गुन्हा नोंद केला आहे. या अपघातात दुचाकीवरील जखमी झालेल्या मुलांची नावे आयुष शिरवईकर व तनिश गावस अशी आहेत. ते दोघेही ताळगावातील रहिवाशी आहेत.

2 children were injured when two wheeler hit police jeep in goa
Goa: तंबाखू विरोधी जाहिरातींना बंदी

तपास अधिकारी पोलीस हवालदार नितीन सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस जीप ताळगाव येथून पणजीच्या दिशेने येत होती तर दुचाकीवरील हे दोन्ही मुले त्याच दिशेने भरधाव वेगाने जात होते. यावेळी दुचाकीची ठोकर पोलिस जीपला बसली व हे दोघे रस्त्यावर फेकले गेले. दोघांनाही रक्तबंबाळ अवस्थेत पोलिस जीपने गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांची जबानी नोंदवण्यास परवानगी दिल्ली नाही असे हवालदार सावंत यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.