TAUKTAE Cyclone Update: गोव्यात 2 मृत्यूची नोंद; 500 झाडे कोसळली

TAUKTAE Cyclone Update: गोव्यात 2 मृत्यूची नोंद; 500 झाडे कोसळली
tree 1

गोव्यात दोन मृत्यूची नोंद झाली आहे. 500 हून अधिक झाडे कोसळली आहेत. सुमारे 100 मोठी घरे आणि 100 किरकोळ घरे खराब झाली. रस्ते ब्लॉक झाले आहेत. वीजपुरवठा खंडित झाला असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. पणजीत (Panaji) 108 मिली पावसाची नोंद झाली आहे. झाडे कोसळण्याचे प्रणाम वाढले आहे. कोविड संबधी आपत्कालीन सेवांना प्राधान्य देण्यात आल्याने इतर ठिकाणच्या घटनांकडे जाण्यासाठी अग्निशामक दलाला पोहचण्यास दिरंगाई होत आहे. 4 नंतर राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी वाऱ्याचा  वेग कायम आहे. वादळाचे कोकण किनाऱ्याकडे प्रस्तान झाले असून पणजीपासून अवघ्या 100. 6 किमी अंतरावरून जात आहे. सगळीकडे वाऱ्याचा जोर कायम आहे, पावसाचा जोर ओसरत आहे पण काही काळाने पाऊस पुन्हा जोर धरील असा वेधशाळेचा अंदाज आहे. राज्यात झाडे, विजखांब कोसल्याच्या 150 हुन अधिक घटना आहे, पण प्रत्येक ठिकाणी पोहचण्यास अग्निशामक दलाला शक्य नसल्याने हतबलता आहे. 

आतापर्यंत किती पावसाची नोंद?
पेडणे येथे 75 मिली
जुन्या गोव्यात 88.5
म्हापसा 111.5 मिली 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात ((Arabian Sea) निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तौकते (Tauktae) वादळ निर्माण होऊन ते किनारपट्टीवर धडकण्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. अखेर आज तौकते हे चक्रीवादळ गोव्याच्या (Goa)  किनारपट्टी भागावर धडकले असून, आज सकाळ पासूनच या वादळाचे परिणाम दिसायला सुरुवात  झाली आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com