काणकोणात दोघांचा कोरोनामुळे मृत्यू

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

मृत्यू झालेल्यांमध्ये गावडोंगरीतील नारायण बाबू वेळीप (वय६५) व खोतीगावातील सीता गावकर (वय५७) यांचा समावेश आहे. नारायण वेळीप यांना मृतावस्थेत काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात गुरुवारी आणण्यात आले होते.

काणकोण-  शहरात दोन दिवसांत दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आजपर्यंत कोरोनामुळे काणकोणात नऊ कोरोनाग्रस्तांचे बळी गेले. आतापर्यंत काणकोणात एकूण ५९० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी  ४४० रूग्ण कोरोनामुक्त झाले असून १४१ रुग्ण एक्टिव्ह आहेत. 

मृत्यू झालेल्यांमध्ये गावडोंगरीतील नारायण बाबू वेळीप (वय६५) व खोतीगावातील सीता गावकर (वय५७) यांचा समावेश आहे. नारायण वेळीप यांना मृतावस्थेत काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात गुरुवारी आणण्यात आले होते. त्यावेळी  त्याची एन्टीजन तपासणी केली असता ते पॉझिटिव्ह सापडले. तर सीता गावकर हिचा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार चालू असताना मृत्यू झाला. 

गेल्या दोन दिवसांत अकरा कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये पोळे, पारयेकट्टा - भाटपाल, धुप्यामळ - भाटपाल, नगर्से येथे  प्रत्येकी  दोन कोरोना रूग्ण सापडले आहेत. त्याशिवाय राजबाग-तारीर, दाबेल व भगतवाडा येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.

संबंधित बातम्या