चोवीस तासांत २ इंच पाऊस

Vilas Ohal
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

राज्य वेधशाळेने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यभरात गेल्या चोवीस तासांत दोन इंच पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात ११७ इंच पाऊस नोंदला गेला असून, वेधशाळेने मंगळवारप्रमाणेच आजही राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पर्जन्यवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे. तर इतर भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल, असे म्हटले आहे.

विलास ओहाळ
पणजी : 

राज्यात काही भागात पाऊस ज्या प्रकारे विश्रांती घेऊन पडत आहे, त्यावरून श्रावणातील सरींचीच आठवण होत आहे. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर ज्याप्रकारे सरी कोसळतात, तसाच पाऊस सध्या हजेरी लावत आहे. वेधशाळेने काही भागात ठिकाणी मुसळधार वृष्टी होण्याची शक्यता मंगळवारीही वर्तविली होती. आजही त्यांनी त्याचप्रकारे शक्यता वर्तविली आहे. मागील चोवीस तासांत राज्यात २ इंच पाऊस पडल्याचे नोंदले गेले आहे.
वेधशाळेकडे विविध ठिकाणी सेंटीमीटरमध्ये नोंदलेला पाऊस : वाळपई ९, साखळी ७, केपे व सांगे प्रत्येकी ५, म्हापसा व जुने गोवे प्रत्येकी ४, पेडणे, फोंडा व पणजी प्रत्येकी ३ आणि काणकोण २ तर मडगाव १.

संपादन : महेश तांडेल

संबंधित बातम्या