डिचोलीत कोरोनाचे आणखी दोन बळी

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

 डिचोलीत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाने दहशत घालताना आज सोमवारी एका ज्येष्ठ महिलेसह दोघांचे बळी घेतले.

डिचोली :  डिचोलीत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाने दहशत घालताना आज सोमवारी एका ज्येष्ठ महिलेसह दोघांचे बळी घेतले. उपचारार्थ बांबोळी येथील गोमेकॉत दाखल केलेल्या ७३ वर्षीय ज्येष्ठ महिलेसह ६४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य खात्याच्या बुलेटिनवरून मिळाली आहे. काल कोरोनामुळे तालुक्यात तिघांचे बळी गेले आहेत. सलग दोन दिवसात मिळून पाच बळी गेल्याने तालुक्यात चिंता वाढली आहे.

सोमवारी डिचोली तालुक्यात अकरा कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. तर सलग तिसऱ्या दिवशी  कोविड सुविधा केंद्रात एकही रुग्ण नसल्याची माहिती मिळाली आहे. आज डिचोली विभागात ३, मये विभागात २, तर साखळी विभागात ६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून उपलब्ध झाली आहे. सोमवारी डिचोली विभागात ३५, मये विभागात ३६ आणि साखळी विभागात ६९ मिळून तालुक्यात एकूण १४० कोरोनाचे सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. आज तालुक्यातील डिचोली विभागात ७, मये विभागात ५ आणि साखळी विभागात १३ मिळून २५ रुग्ण बरे झाले आहेत.  डिचोलीत - ३४, मयेत - ३२ आणि साखळीत - ५५ मिळून १२१ रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. डिचोलीतील १, मयेतील ४ आणि साखळीतील १४ मिळून तालुक्यातील १९ रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार चालू आहेत, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून मिळाली 
आहे.

संबंधित बातम्या