मडगावची अनेस्का आणि फोंड्याची कॅरन सुखरुप गोव्यात परतल्या

घरच्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास, अन्य दोन विद्यार्थी आज रात्री दिल्लीला पोहोचणार
Goan Students Returned from Ukraine
Goan Students Returned from UkraineDainik Gomantak

मडगाव : बोर्डा मडगाव येथील अनेक्सा फेर्नांडिस आणि फोंड्याची कॅरन फर्नांडिस या युक्रेनला अडकून पडलेल्या दोन गोमंतकीय विद्यार्थीनी आज सुखरूप गोव्यात पोहोचल्याने त्यांच्या पालकांनी सुटकेचा श्वास सोडला. आपली मुले युद्धभूमीत अडकल्यामुळे त्यांचा जीव टांगणीला लागला होता. (Goan Students Returned from Ukraine News Updates)

Goan Students Returned from Ukraine
भाजप सरकार आमचे फोन टॅप करतंय, गिरीश चोडणकरांचा गंभीर आरोप

बॉम्बवर्षाव चालू असतानाही अनेस्का आणि तिच्या मैत्रिणीनी मोठ्या कष्टाने रोमेनिया गाठली आणि त्यानंतर काल रात्री त्यांनी भारतात (India) येण्याचे विमान पकडले. बॉम्बवर्षाव होताना त्यांनी बंकरचाही आश्रय घेतला, अशी माहिती त्यांच्या पालकांनी दिली.

अनेस्का ही बोर्डा - मडगाव येथे राहणारी असून अनेक गोमंतकीय विद्यार्थ्यांप्रमाणे तीही शिक्षण घेण्यासाठी ती युक्रेनात गेली होती. तिचे वडील मिल्टन फर्नांडिस यांनी दिलेल्या माहितीनुसार ती युक्रेनच्या पश्चिम भागात राहात होती. 26 फेब्रुवारीला ती युक्रेनातून बाहेर पडणार होती. मात्र तोपर्यंत तिथे युद्ध भडकल्याने ती तिथे अडकून पडली.

Goan Students Returned from Ukraine
आरएसएस म्हणतं भाजप फटिंगाचा बाप, गिरीश चोडणकरांचा खोचक टोला

एनआरआय संचालक अँथनी डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार बाणावली येथील जोलिफा गोएस आणि दाबोळी येथील मिहीर देशपांडे हे दोन अन्य गोमंतकीय विद्यार्थी (Student) रोमेनियातून भारतात येण्यासाठी विमानात बसले असून आज रात्री ते दिल्लीत पोहोचण्याची शक्यता आहे.

कुडतरी येथील जोमार्क डायस (22) हा युक्रेनात (Ukraine) अडकलेला विद्यार्थी सध्या पोलंडला पोहोचला असून अन्य चार विद्यार्थिनी हंगेरीला पोहोचल्या आहेत. युद्धग्रस्त खार्किव्ह या शहरात अडकलेल्या दोन विद्यार्थिनी लिव्ह या शहरात जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसल्या असून समी या शहरात अडकलेल्या बाणावली येथील जेडन परेरा यालाही बाहेर काढण्याचे प्रयत्न तिथल्या भारतीय दूतावासाद्वारे चालू आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com