गोव्यात दर तीन दिवसांतून एकदा होतो ड्रग्जचा गुन्हा दाखल, वर्षभरात ६ कोटींचा १३१ किलो ड्रग्ज जप्त

2 narcotic cases get filed in Goa within every week
2 narcotic cases get filed in Goa within every week

पणजी: राज्यात कोविड महामारी काळात पर्यटकांची उपस्थिती कमी असूनही ड्रग्ज व्यवसाय मात्र समुद्रकिनारी भागात जोमाने सुरू आहे. यावर्षी ११ महिन्यांत १३१ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे. 

जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे सहा कोटींच्या जवळपास आहे. सरासरी २ ते ३ दिवसांमागे एक ड्रग्ज गुन्हा राज्यात नोंद होत आहे. या व्यवसायात परप्रांतीयांबरोबर स्थानिकही मोठ्या प्रमाणात आहेत. गोवा ड्रग्जमुक्त करण्यास पोलिस यंत्रणा सक्रिय झाल्याने प्रकरणांच्या नोंदीमध्ये वाढ झाली आहे.  


राज्यात विविध पोलिस स्थानके, क्राईम ब्रँच, अंमलीपदार्थविरोधी कक्षामार्फत आतापर्यंत १३० प्रकरणे नोंद झाली आहेत, तर १४८ जणांना अटक झाली आहे. त्यामध्ये ७१ परप्रांतीय, ४६ गोमंतकीय व ३० विदेशी संशयित आहेत. विदेशींमध्ये सर्वाधिक संशयित हे नायजेरियन (८) व रशियन (८) आहेत. नेपाळी - ३, जर्मनी - २ तर टर्की, लेबानिस, आयवोरी कोस्ट, आयवोरिन, नेदरलँड, श्रीलंका, मेक्सिको, झेक रिपब्लिका व इस्रायलचे प्रत्येकी एक संशयित आहेत. अधिक तर प्रकरणे कळंगुट, हणजूण, पेडणे भागात झाली आहेत. किनारपट्टी परिसरात ड्रग्ज माफिया व विक्रेत्यांचा अधिक सुळसुळाट आहे. 


आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या ड्रग्‍जमध्ये एमडीएमए ९२५ ग्रॅम्स, एक्सटसी गोळ्या - २७०.५४३ ग्रॅम्स, एलएसडी ४५.६७४ ग्रॅम्स, कोकेन २४२.२२५ ग्रॅम्स, चरस ७ किलो २९२.८ ग्रॅम्स, गांजा ७७ किलो ६०८.३ ग्रॅम्स, ओपियम १७.१ ग्रॅम्स, ॲम्फेटामिन ५.२ ग्रॅम्स, हेरॉईन २४ ग्रॅम्स व कॅनाबिस रोपे ४४ किलो ५६३ ग्रॅम्स याचा समावेश आहे. 


अंमलीपदार्थविरोधी कक्षाची गेल्या पाच वर्षाची कामगिरी दिवसेंदिवस सुधारत आहे. २०१६ साली २४ प्रकरणांमध्ये ३० जणांना अटक करून  ५० लाखांचा ड्रग्ज जप्त केला होता. २०१७ मध्ये २९ प्रकरणे नोंदवून दीड कोटीचा ड्रग्ज ३५ जणांकडून ताब्यात घेतला गेला. २०१८ मध्ये ही प्रकरणे वाढतच जाऊन ३१ वर पोहचली व ३५ जणांना अटक केली. मात्र, जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमध्ये घट झाली. १ कोटी १५ लाखांचा ड्रग्ज पकडण्यात आला. २०१९ मध्ये पुन्हा त्यात सुधारणा होत दीड कोटीचा ड्रग्ज जप्त केला गेला व २७ प्रकरणांमध्ये ३० जणांना अटक केली. यावर्षी नोव्हेंबरपर्यंत २२ प्रकरणे नोंदवून २४ जणांना अटक केली. ३० किलो ड्रग्ज जप्त केला त्याची किंमत २ कोटी ६६ लाख रुपये आहे. 


अंमलीपदार्थविरोधी कक्षाने गेल्या पाच वर्षात १२५ किलो ड्रग्ज केला आहे त्याची किंमत सुमारे ७.५ कोटी रुपये आहे.  १३३ प्रकरणे नोंद केली आहेत. त्यामध्ये १५४ जणांना अटक झाली आहे. त्यामध्ये १०० जण भारतीय, तर ५४ जण विदेशी नागरिक आहेत. २०२० मध्ये या कक्षाने १९ किलो गांजा, २.८७६ किलो चरस, ८९९ ग्रॅम एमडीएमए, ३३.८८५ कोकेन, २४५.७४३ एक्सटसी, तर २६.७७४ एलएसडी पेपर्स यांचा समावेश आहे.  बेकायदेशीर वास्तव्यप्रकरणी यावर्षी २९ विदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी म्हापसा येथील बंदिस्त केंद्रामध्ये (डिटेंशन सेल) रवानगी करण्यात आली आहे. त्यामध्ये १० पुरुष व १९ महिला आहेत. पुरुषांमध्ये २ नायजेरियन व २ नेपाळी तसेच केनिया व उगांडाचे प्रत्येकी ४ जण होते. महिलांमध्ये १ केनिया व १८ युगांडा देशातील आहेत. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com