KTC AC Buses: खुशखबर! कदंबच्या ताफ्यात 20 नव्या AC इलेक्ट्रिक बस दाखल; बस अनेक सुविधांसह सुसज्ज

इलेक्ट्रिक बसमध्ये दिव्यांग लोकांना चढ-उतार करण्यासाठी विशेष सुविधा देण्यात आली आहे. तसेच, बस पोलिस ठाण्याची कनेक्ट व रियल टाईम टेबल अशा सुविधांना सज्ज आहे.
KTC New AC Buses
KTC New AC BusesDainik Gomantak

KTC New AC Buses: कदंब महामंडळाच्या ताफ्यात वीस नव्या एसी इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. इलेक्ट्रिक बसमध्ये दिव्यांग लोकांना चढ-उतार करण्यासाठी विशेष सुविधा देण्यात आली आहे. तसेच, बस पोलिस ठाण्याची कनेक्ट व रियल टाईम टेबल अशा सुविधांना सज्ज आहे.

बांबोळी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नव्या बसेसचे उद्घाटन करता त्यांना हिरवा झेंडा दाखवला. पणजी स्मार्टसिटीसाठी या बसेस असणार आहेत.

यावेळी यावेळी परिवहन मंत्री माविन गुदिन्हो, केटीसीएल अध्यक्ष उल्हास तुयेकर, पणजी महापौर रोहित मोन्सेरात, KTCL चे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

"आम्ही शंभर टक्के इलेक्ट्रिक बसेस बाजारात आणल्या, त्यांनी आत्तापर्यंत 74 लाख कि.मी अंतर कापले आहे. यामुळे 36 टक्के कार्बन उत्सर्जन कमी झाले. जेव्हा 100 इलेक्ट्रिक बस रस्त्यावर धावायला लागतील त्यावेळी विचार कार कती कार्बन उत्सर्जन कमी होईल." असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

"यापुढे जेव्हा दुचाकी, चारचाकी वाहन घेणार तेव्हा इलेक्ट्रिक वाहन घेण्याचा विचार करा." असे आवाहन सावंत यांनी यावेळी केले.

KTC New AC Buses
Anmod Check Post: गोव्यातून कर्नाटकात जाताय? आता अनमोड घाटात द्यावे लागणार प्रवेश शुल्क, वन खात्याचा निर्णय

बसची बैशिष्ट्ये काय?

- दिव्यांग लोकांसाठी चढणे उतरणे सुलभ होणार.

- बसमधील अत्याधुनिक कॅमेरे पोलिस स्टेशनची जोडले गेलेले आहेत.

- बसची रियल टाईम माहिती मोबाईवर मिळेल, त्यासाठी मोबाईल अॅप येणार.

- तिकिटासाठी क्यू आर कोड सुरू केला आहे.

चार बसस्थानके आधुनिक होणार

वास्को, मडगाव, पणजी आणि म्हापसा ही बसस्थानके आधुनिक केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी दिली. तसेच, खासगी बस लवकरच कदंब महामंडळात समावेश करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती सावंत यांनी दिली. लवकरच गोव्यात देखील आठ नंतर सार्वजनिक बस वाहतूक उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com