मोसम सुरू होऊन 20 दिवस उलटले तरी मासेमारीला अपेक्षित गती नाहीच

मालिम जेटीवर त्याहूनही अधिक कठीण परिस्थिती असून या जेटीवरून फक्त 5 ते 10 टक्के ट्रॉलरच पाण्यात उतरले आहेत.
गोव्यात मासेमारी मोसम सुरू होऊन 20 दिवस उलटले तरी अजून राज्यातील मासेमारीने अपेक्षित गती घेतलेली नाही.
गोव्यात मासेमारी मोसम सुरू होऊन 20 दिवस उलटले तरी अजून राज्यातील मासेमारीने अपेक्षित गती घेतलेली नाही. Dainik Gomantak

मडगाव: गोव्यात मासेमारी मोसम (Fishing season) सुरू होऊन 20 दिवस उलटले तरी अजून राज्यातील मासेमारीने अपेक्षित गती (Expected speed of fishing) घेतलेली नाही. डिझेलचे वाढलेले दर, कामगारांची कमतरता आणि अशातच खराब हवामान याचा फटका बसल्याने अजूनही 70 टक्के ट्रॉलर तडीवरच नांगरलेल्या अवस्थेत दिसतात.

गोव्यात मासेमारी मोसम सुरू होऊन 20 दिवस उलटले तरी अजून राज्यातील मासेमारीने अपेक्षित गती घेतलेली नाही.
GOA: मासेमारी बंदी, ट्रॉलर्समधून माशांचे जाळे बाहेर, होड्या किनाऱ्यावर...

गोव्यातील सर्वात मोठी जेटी असलेल्या कुटबण येथील बोटमालक संघटनेचे अध्यक्ष फ्रांको मार्टिन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 40 टक्के ट्रोलरच पाण्यात उतरले असून निम्म्यापेक्षा अधिक ट्रॉलर तडीवरच नांगरलेल्या अवस्थेत आहेत. खवळलेल्या दर्यात काही जणांनी ट्रॉलर घालण्याचे प्रयत्न केले पण लाटांच्या तडाख्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले. तर दोन खलाशांचा मृत्यूही झाला असे त्यांनी सांगितले.

मालिम जेटीवर त्याहूनही अधिक कठीण परिस्थिती असून या जेटीवरून फक्त 5 ते 10 टक्के ट्रॉलरच पाण्यात उतरले आहेत. कामगार अजून न आल्याने नाईलाजाने हे ट्रॉलर बंद ठेवण्याची पाळी आली आहे अशी माहिती मांडवी मासेमारी सहकारी सोसायटीचे सदस्य फ्रान्सिस फेर्नांडिस यांनी दिली.

गोव्यात मासेमारी मोसम सुरू होऊन 20 दिवस उलटले तरी अजून राज्यातील मासेमारीने अपेक्षित गती घेतलेली नाही.
Illegal Fishing: मासेमारी नौकेची नोंदणी करणे बंधनकारक का आहे ?

फेर्नांडिस म्हणाले, वास्तविक परराज्यातील कामगार 15 ऑगस्ट पर्यंत गोव्यात पोहोचतात त्यानंतर राज्यात मासेमारीला गती येते. मात्र यावेळी कामगार अजून पोहोचले नाहीत त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मासेमारी पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकेल.

मागच्या वर्षी मच्छिमारांचा मोसम कोविडमुळे वाया गेला होता. यावेळी कोविडचा उद्रेक कमी असला तरी कामगार मिळत नसल्याने मच्छिमार हवालदिल झाले आहेत. गोव्यात या व्यवसायातील कामगार झारखंड मधून येतो. मात्र यावेळी रेल्वे पूर्ण क्षमतेने चालू नसल्याने कामगारांना खास बस पाठवून गोव्यात आणावे लागते. यासाठी एका माणसामागे किमान 6 हजार रुपये खर्च येतो. एक बस पाठवायला किमान 2 लाख रुपये खर्च येतो अशी माहिती मच्छिमारांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com