म्हापसा स्थानबद्धता केंद्रात 20 विदेशी नागरिक; ८ महिलांचाही समावेश

विशेष व्हिसा देऊन खटला संपेपर्यंत विदेशी नागरिक देशात असतील
म्हापसा स्थानबद्धता केंद्रात 20 विदेशी नागरिक; ८ महिलांचाही समावेश
foreign nationals in MapusaDainik Gomantak

पणजी: म्हापसा (Mapusa) येथील स्थानबद्धता केंद्रात 20 विदेशी नागरिकांना (foreign nationals) ठेवले आहे. त्यामध्ये 12 पुरुष व 8 महिला आहेत. त्यातील पाचजणांविरुद्ध न्यायालयात खटला सुरू असून तो पूर्ण होईपर्यंत वास्तव्यासाठी त्यांना ‘विशेष व्हिसा’ (visa) देण्यात येणार असल्याची माहिती विदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयातर्फे देण्यात आली.

या स्थानबद्धता केंद्रातील विदेशी नागरिक हे बेकायदेशीर वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांना मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया या कार्यालयाने सुरू केली आहे. 12 पुरुष विदेशी नागरिकांपैकी 10 जण नायजेरियातील असून पाचजणांविरुद्ध न्यायालयात अंमलीपदार्थप्रकरणीच्या रोपाखाली खटला सुरू आहे. खटल्यावरील सुनावणीवेळी त्यांना न्यायालयात उपस्थित राहणे अगत्याचे आहे. त्यांची मायदेशात पाठवणी केल्यास ते पुन्हा येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्यांना विशेष व्हिसा देऊन खटला संपेपर्यंत ते देशात असतील. तसेच न्यायालयातील खटल्यातील नायजेरियन्सना शिक्षा झाली तर त्यांना भारतातील प्रवेशास बंदी असलेल्या काळ्या यादीत समावेश केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

foreign nationals in Mapusa
Goa: कर्नाटकने यंदाही म्हादईचा गळा घोटलाच

दस्तऐवजाची खातरजमा झाल्यानंतरच पासपोर्ट

न्यायालयातील खटल्यांना सामोरे जात असलेल्या काही विदेशी नागरिकांकडे अधिकृत पासपोर्ट किंवा व्हिसाही नाही. त्यांच्याकडे जी छायांकित प्रत आहे त्या दस्ताऐवजांची पडताळणी करण्यासाठी ‘एफआरआरओ’ने त्या संबंधित देशाचे मुंबई व दिल्लीत असलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. त्यामुळे हे दस्ताऐवजाचा अधिकृतपणा तसेच त्यांची ओळख पटविण्यास मदत होणार आहे. या दस्ताऐवजाची खातरजमा झाल्यानंतरच त्यांना पासपोर्ट देण्यात येईल.

foreign nationals in Mapusa
Goa Murder Case: पोस्टमॉर्टम रिपोर्ट माहित नसल्याने पिडितेचे वडिल अंधारातच

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com