वीस अधिकाऱ्यांना निरीक्षकपदी बढती

विलास महाडिक
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

हा आदेश आज पोलिस अधीक्षक (मुख्यालय) अरविंद गावस यांनी काढला.

पणजी

पोलिस खात्यातील १५ उपनिरीक्षकांना नियमित पोलिस निरीक्षकपदी, तर ५ उपनिरीक्षकांना हंगामी निरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. हा आदेश आज पोलिस अधीक्षक (मुख्यालय) अरविंद गावस यांनी काढला.
ज्या पंधराजणांना निरीक्षकपदी बढती मिळाली आहे, त्यामध्ये रामकृष्ण मंगेशकर (म्हापसा वाहतूक कक्ष), आनंद शिरोडकर (वास्को विशेष शाखा), अनंत गावकर (फातोर्डा पोलिस स्थानक), संदीप केसरकर (म्हापसा पोलिस स्थानक), हरिष गावस (डिचोली विशेष शाखा), तुळशीदास नाईक (मडगाव पोलिस स्थानक), महेश गडेकर (उत्तर गोवा पोलिस अधीक्षक कार्यालय), रत्नाकर कळंगुटकर (पणजी याचिका कक्ष), विजयकुमार चोडणकर (म्हापसा पोलिस स्थानक), विदेश शिरोडकर (आर्थिक गुन्हे कक्ष), रझाशद शेख (केपे वाहतूक कक्ष), सतिश पडवळकर (एसआयटी, पणजी), विजयनाथ कवळेकर (पणजी, मुख्यालय), मनोज मलिक (कुडचडे पोलिस स्थानक) यांचा समावेश आहे.
ज्या पाचजणांना हंगामी निरीक्षकपदी बढती मिळाली आहे त्यामध्ये विनायक पाटील (कोकण रेल्वे पोलिस स्थानक), दत्ताराम राऊत (क्राईम रिडर, मुख्यालय), मिरा डिसिल्वा (राज्य पोलिस नियंत्रण कक्ष), लक्षी आमोणकर (मडगाव पोलिस स्थानक) यांचा समावेश आहे.

संपादन -अवित बगळे

संबंधित बातम्या