‘यूएलईआर’मध्‍ये 20 टक्के राखीव जागा गोवेकरांसाठी

मुख्‍यमंत्री : कायदा शिक्षण आणि संशोधन विद्यापीठाचे उद्‌घाटन
‘यूएलईआर’मध्‍ये 20 टक्के राखीव जागा गोवेकरांसाठी
Pramod SawantDainik Gomantak

कुठ्ठाळी : आशिया खंडातील पहिली इंटरनॅशनल युनिव्‍हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्चचे उद्‌घाटन आज गुरुवारी सांकवाळ येथे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. ही संस्था लवकरच धारबांदोडा येथे स्थलांतरित करण्यात येईल असे सांगून या संस्थेत गोमंतकीयांसाठी 20 टक्के जागा राखीव असतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Pramod Sawant
पेडे जंक्शनवर लवकरच वाहतूक सिग्नल

यावेळी व्यासपीठावर गोव्याचे न्यायमूर्ती एम. एस. सोनक, कायदामंत्री नीलेश काब्राल, ॲडव्‍होकेट जनरल देविदास पांगम, न्या. संजीत पाणिग्रही, आर. एन. दत्ता, दिनेश पाठक, अनिवासी आयुक्त ॲड. नरेंद्र सावईकर, खासदार विनय तेंडुलकर, कुठ्ठाळीचे आमदार ॲन्थनी वाझ, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, सरपंच गिरीश पिल्लई, भूतानचे माजी न्यायमूर्ती रिमझिम, गिलमन परेरा आदी मान्‍यवर उपस्थित होते.

Pramod Sawant
गोवा वेल्हा बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

गोव्‍याला शैक्षणिक हब बनवण्‍याचे आपले स्वप्न साकार होत असल्याने आज आनंद होत आहे, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

गोव्यात अशा प्रकारच्या दर्जेदार शैक्षणिक संस्‍थेची (कायदा) मुहूर्तमेढ रोवली गेली ही अभिमानास्‍पद बाब होय. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या प्रयत्‍नांमुळेच हे शक्‍य झाले. हा एक सर्वांसाठी ऐतिहासिक क्षण आहे. जागतिक पातळीवरील या कायदा विद्यापीठाचे नाव भविष्यात निश्‍चितच उज्ज्वल होईल. येथून कार्यकुशल वकील तयार व्हावेत ही शुभेच्छा.

- भूषण गवई, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com