गोव्याच्या विकासासाठी २०० कोटी रुपये

goa development
goa development

एकात्मिक किनारी व्यवस्थापन आराखड्यासाठी दोनशे कोटी रुपयांत 12 प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या आराखड्याचे 10 वर्षांपूर्वी काम सुरु केले होते, त्यावेळी हा आराखडा 1 हजार 600 कोटी रुपये खर्चाचा असेल असे गृहित धरण्यात आले होते. एकात्मिक आराखड्यात प्रदूषण नियंत्रण आराखडा, आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा, पर्यटन व्यवस्थापन आराखडा, किनारा व्यवस्थापन आराखडा, शाश्‍वत उपजीविका आराखडा आणि संवर्धन व्यवस्थापन आराखडा यांचा समावेश आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी 18 कोटी 72 लाख रुपये खर्च आला आहे. (200 crore for the development of Goa)

उत्तर व दक्षिण गोव्यातील मिळून 77 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवर धूप प्रतिबंधक उपाययोजनेसाठी 97 कोटी 43 लाख रुपये, वार्षिक देखभालीसाठी 6 कोटी रुपये असे मिळून 103 कोटी 43 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. सागरी कासवांचे संवर्धन, संरक्षणासाठी 13 कोटी 67 लाख रुपये, किनारी वाळू टेकड्यांची उद्याने विकसित करण्यासाठी 2 कोटी 59 लाख रुपये, सागरी जैवविविधता संवर्धनासाठी 55 लाख रुपये तर खाजन शेतीसाठीचे बांध दुरुस्तीसाठी 16 कोटी 30 लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.


गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळासाठी नव्या प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी 15 कोटी 84  लाख रुपये, राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानुसार सांडपाणी व मलनिस्सारण यंत्रणा बसविण्यासाठी 750 कोटी रुपये, कळंगुट-कांदोळीसाठी मलनिस्सारण योजनेसाठी 209 कोटी 11 लाख रुपये मिळून 974 कोटी रुपये खर्च येईल, अशी अपेक्षा एकात्मिकच्या प्राथमिक अहवालात नोंदवण्यात आली आहे. नूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोत निर्मितीसाठी 6 कोटी रुपये, शाश्‍वत निसर्ग पर्यटनासाठी 9 कोटी 84 लाख रुपये, कळंगुट आणि कांदोळीतील पर्यटन सुविधा विकसित करण्यासाठी 75 कोटी रुपये, नदीच्या मुखाशी असलेल्या मत्स्यसंपदेची नोंदणी करण्यासाठी 90 कोटी 84 लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता.

\या एकात्मिक आराखड्यानुसार प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले. प्रारूप आराखडा तयार करून गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी सादर केला  गेला. त्यांच्या मान्यतेनंतर महिनाभरात केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाला हा आराखडा सादर केला गेला. त्यांच्या मान्यतेनंतर आता जागतिक बॅंकेच्या मान्यतेची राज्य सरकारला प्रतीक्षा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com