गोवा महापालिका निवडणूकीसाठी 205 उमेदवारी अर्ज दाखल

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 मार्च 2021

सहा पालिका व एका महापालिकेसाठी आज एकूण 169 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले. त्यामुळे आज पाचव्या दिवशी एकूण 205 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

पणजी: सहा पालिका व एका महापालिकेसाठी आज एकूण 169 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले. त्यामुळे आज पाचव्या दिवशी एकूण 205 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सहा पालिकांसाठी आज 132 तर एका महापालिकेसाठी 37 अर्ज दाखल झाले. त्यामध्ये भाजप समर्थक आमदार बाबुश मोन्सेरात यांच्या ‘टुगेदर फॉर अ प्रोग्रेसिव्ह पणजी’ या पॅनलच्या 30 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये मोन्सेरात यांचे पुत्र रोहित मोन्सेरात हे महापालिका प्रभाग 3 मधून तर विद्यमान महापौर उदय मडकईकर हे प्रभाग 14 मधून अर्ज सादर केला. उमेदवारी अर्ज सादर करताना आमदार मोन्सेरात हे जातीने उपस्थित राहिले होते. 

मी पुन्हा येणार! गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांचं अप्रत्यक्ष प्रतिपादन 

दरम्यान, ‘टुगेदर फॉर अ प्रोग्रेसिव्ह पणजी’ या पॅनलबाबत भाजप नेते माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर तसेच दत्तप्रसाद नाईक यांनी नाराजी व्यक्त करताना चांगल्या उमेदवारांना ते पाठिंबा देतील असे सांगितले. त्यामुळे भाजप समर्थक नेत्यांमध्येच महापालिका उमेदवार पॅनलबाबत मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे भाजप समर्थक पॅनलच्या विरोधात भाजप नेत्यांचे समर्थन असलेले उमेदवार उभे राहत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजप समर्थक उमेदवार विरुद्ध भाजप नेत्यांचा पाठिंबा असलेले उमेदवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी गेल्या 2 वर्षात पणजी शहरात विकास झाला नसल्याचा आरोप केला होता. महापालिका प्रभाग 10 मधून ॲड. विष्णू नाईक हे निवडणूक लढवत आहेत त्याला सिद्धार्थ कुंकळ्येकर व दत्तप्रसाद नाईक यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. गोवा खंडपीठाने पाच पालिकांची निवडणूक रद्द केल्याने राज्य निवडणूक आयोगाने या पालिकांची निवडणूक स्थगित ठेवून आचारसंहिता मागे घेतली आहे. त्यामुळे मुरगाव, मडगाव, केपे, सांगे व म्हापसा पालिकांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारणे बंद करण्यात आले आहे.

शिवजयंती मिरवणूक कळंगुटपर्यंत नेणारच; गोव्यातील शिवप्रेमींचा निर्धार 

संबंधित बातम्या