सहा दिवसांत २१ ‘कोविड’चे बळी

Tejshri Kumbhar
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या सहा दिवसांत २१ कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. मागील चोवीस तासांत दोघांचा बळी गेला. त्‍यामुळे राज्यात आजवर झालेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची संख्या ६६ वर पोहोचली आहे. आज दिवभरात १९१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, तर १६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यामुळे राज्यात २०९५ जण सक्रिय कोरोनाग्रस्त आहेत. कोरोनामुळे आज मृत्यू झालेल्‍यात वास्को येथील ६७ वर्षीय आणि ७३ वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

तेजश्री कुंभार

पणजी :

मिळालेल्या माहितीनुसार, आजच्या दिवशी चार देशी प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले. हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये ६९ जणांना ठेवण्यात आले. २६२६ जणांच्‍या लाळेचे नमुने घेण्यात आले, तर २१३७ जणांचे अहवाल हाती आहेत. रेल्‍वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले १३ रुग्ण आहेत. डिचोलीत १२, साखळीत ६०, पेडणेत ३७, वाळपईत ६७, म्हापसात ७६, पणजीत ७८, बेतकी येथे १७, कांदोळीत ५७, कोलवाळ येथे ४३, खोर्लीत ५२, चिंबल येथे १२०, पर्वरीत ४८, कुडचडेत ३५, काणकोणात १४, मडगावात १५६, वास्कोत ३६८, लोटलीत ३५, मेरशीत २६, केपेत ४०, सांगेत १९, शिरोडा येथे ४०, धारबांदोडा येथे ३१, फोंडा येथे १०८ आणि नावेलीत ४७ रुग्ण आणि राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आढळल्‍याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यू
१ ऑगस्ट ३
२ ऑगस्ट ५
३ ऑगस्ट ३
४ ऑगस्ट ४
५ ऑगस्ट ४
६ ऑगस्ट २

संपादन : महेश तांडेल

संबंधित बातम्या