गोवा पोलिसांनी 5 वर्षांत 21 मसाज पार्लर्स केले ‘सील’

अतारांकित प्रश्‍नावर मुख्यमंत्री सावंत यांची माहिती
CM Pramod Sawant Statement on Mopa and Dabolim Airport Goa
CM Pramod Sawant Statement on Mopa and Dabolim Airport Goa Dainik Gomantak

पणजी: गेल्या पाच वर्षात पोलिसांनी राज्यातील मसाज पार्लर व स्पा यावर छापे टाकून केलेल्या कारवाईत 21 मसाज पार्लर्सना टाळे ठोकले आहे. उत्तर गोव्यात 9 तर दक्षिणेतील 12 मसाज पार्लर्सचा यात समावेश आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका अतारांकित प्रश्‍नावर उत्तर देताना दिली आहे. (21 massage parlors 'sealed' in 5 years - Chief Minister Pramod Sawant )

CM Pramod Sawant Statement on Mopa and Dabolim Airport Goa
कोणाची मते फुटली, हे जगजाहीर : पाटकर

राज्यात अनेक मसाज पार्लर व स्पा आवश्‍यक परवान्यांशिवाय सुरू असल्याची प्रकरणे पुढे आल्यानंतर विविध पोलिस स्थानक प्रमुखांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रातील मसाज पार्लर व स्पाच्या दस्ताऐवजांची तपासणी सुरू केली होती. बार्देश तालुक्यातील कळंगुट व हणजूण या परिसरातून केलेल्या तपासणीत दोन मसाज पार्लरकडे आवश्‍यक ते परवाने नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी टाळे ठोकले होते.

CM Pramod Sawant Statement on Mopa and Dabolim Airport Goa
स्मृती इराणींच्या मुलीचा 'त्या' बारशी संबंध नाही, आरोप निराधार असल्याचे वकिलाचे स्पष्टीकरण

राज्यात सुरू असलेल्या बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मसाज पार्लर व स्पा वर नजर ठेवण्यासाठी उत्तर व दक्षिण गोव्यासाठी कारवाई पथके स्थापन करण्यात आली आहे.

उत्तर गोव्यातून 9 बंद करण्यात आलेली मसाज पार्लर व स्पा ही पर्वरीतील 2, हणजूण येथील -2, मांद्रेतील 2, कांदोळीतील 2 व सिकेरीतील एक अशी आहेत. या मसाज पार्लरच्या मालकांविरुद्ध तसेच चालकांविरोधात गुन्हे नोंदवून चौकशी सुरू आहे. दक्षिणेतील 12 मसाज पार्लर बंद करण्यात आली आहेत त्यामध्ये केळशी येथील ८, कार्मोणातील ३ तर वार्कातील एका पार्लरचा समावेश आहे. या बंद केलेल्या मसाज पार्लर मालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले असले तरी हे मसाज पार्लर चालविणाऱ्यांही माहिती पोलिसांना हाती लागलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com