मडगावात पालिका निवडणूकीसाठी 22 अर्ज दाखल

दैनिक गोमंतक
गुरुवार, 8 एप्रिल 2021

पालिका निवडणुकीसाठी आज २२ उमेदवारांनी अर्ज सादर केले

सासष्टी: पालिका निवडणुकीसाठी आज २२ उमेदवारांनी अर्ज सादर केले. अर्ज सादर करण्यासाठी उद्या (८ एप्रिल) हा शेवटचा दिवस आहे. आज अर्ज सादर केलेल्या उमेदवारांमध्ये विरोधी पक्षनेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या मॉडेल मडगाव पॅनलच्या उमेदवारांचा समावेश आहे.(22 applications filed for municipal elections in Madgaon)

 पणजीः येत्या महिन्याभरात गुंडांना तडीपार करणार

मडगाव पालिका निवडणुकीसाठी आज भरलेले उमेदवार पुढील प्रमाणे : प्रभाग १ गोंझाक रिबेलो, प्रभाग ५ दिपश्री कुर्डीकर, प्रभाग ७ रॉयस्टन गोम्स, प्रभाग १० ज्योकीम रॉड्रिग्‍ज, प्रभाग १२ स्वप्नील जुवारकर, प्रभाग १३ डोरिस टॅक्सेरा व मोनालिसा विंसेंट, प्रभाग १४ सुलक्षा जामुनी, प्रभाग १५ मनोज मसुरकर, प्रभाग १६ दिपाली सावळ, प्रभाग १७ सिताराम (सिद्धांत) गडेकर, प्रभाग १८ पराग रायकर व घनश्याम प्रभू शिरोडकर, प्रभाग १९ लता पेडणेकर, प्रभाग २० सेंड्रा फर्नांडिस व शामिन बानू, प्रभाग २१ दामोदर शिरोडकर, प्रभाग २२ दामोदर वरक, प्रभाग २३ नादीया वाझ, प्रभाग २४ जितेंद्र नाईक व प्रभाग २५ मधून कुलसूम शेख यांनी अर्ज दाखल केले.
 

संबंधित बातम्या